आईसोबत खरेदीला येणारी मुलगी त्या दुकानाची ब्रँड अँबेसडर बनली

    25-Sep-2022
Total Views |
 
मराठमोळी बॉलिवुड अभिनेत्री मृणाल ठाकुरचे गुपित
 
मृणाल ठाकुरच्या हस्ते पु ना गाडगीळच्या दोन कलेक्शनचे अनावरण
ठाणे : मराठमोळी बॉलिवुड अभिनेत्री मृणाल ठाकुर ही ठाण्यातील वसंतविहार शाळेची विद्यार्थिनी.लहानपणी सणासुदीला ती तिच्या आईसमवेत दागिने खरेदी करायला ज्या मे. पु.ना. गाडगीळ अर्थात पीएनजी ज्वेलर्समध्ये येत असे. मोठेपणी त्याच सराफी पेढीची ती ब्रँड अँबेसेडर बनली आहे.रविवारी मृणालच्या हस्ते पीएनजी च्या 'कथा' या सोन्याच्या आणि 'इना ' या हिर्‍यांच्या दागिन्यांच्या दोन नविन कलेक्शनचे अनावरण करण्यात आले.यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभात अभिनेता पुष्कर श्रोत्री याने मृणालला बोलते केले. त्यावेळी तिने हे गुपित सर्वासमोर उलगडले.
  महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच १९० वर्षाची परंपरा जोपासणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सच्या ठाण्यातील राममारुती रोडवरील पेढीला १० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्त रविवारी या पेढीचे डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या संकल्पनेतील  'कथा' या सोन्याच्या आणि 'इना ' या हिर्‍यांच्या दागिन्यांच्या दोन आगळ्या वेगळ्या कलेक्शनचे अनावरण अभिनेत्री मृणाल हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित ग्राहकांसमक्ष संवाद साधताना मृणालने लहानपणीच्या आठवणी वृद्धींगत केल्या.
 
  "याच पीएनजीमध्ये मी आईसमवेत खरेदीसाठी यायची ! आता त्याच दुकानात दागिन्यांनी मढलेली माझी छबी पाहुन मलाच सुखद धक्का बसला. असे उदगार काढले.तसेच, लहानपणी लपुनछपुन माझ्या आजीच्या संग्रहातील दागिने परिधान करीत असल्याचे सांगुन तिने, आपल्या प्राचीन परंपरेचा मुळीच विसर पडु देऊ नका. असा संदेश युवा पिढीला दिला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.