मनसेचा ’हर हर महादेव’चा जयघोष

कथित व्हिडीओप्रकरणी मनसेचे आंदोलन

    25-Sep-2022
Total Views |
aandolan
 
पुणे : पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्यांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचा ’पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने पुण्यात ’हर हर महादेव’च्या जयघोषात अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. ’दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ ' भारत माता की जय ' या घोषणा आंदोलकांकडून करण्यात आल्या. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
"पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा खपवून घेणार नाही" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
"देशात आणि महाराष्ट्रात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद  घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा प्रकाराची घोषणा आम्हाला मान्य नाही. मी पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर दाखल केलाच पाहिजे. पीएफआय संघटनेचा तपास सातत्याने गेली काही वर्षे पुरावे जमा करुन करण्यात आला आहे त्यासाठी वेगवेगळया राज्यांनी काम केले आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना, राज्यात पीएफआय संघटनेच्या कारवायांची नोंद घेतली जात होती, तपास केला जात होता" अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.