चुन चुन के मारेंगे...इतना याद रखना ! : नितेश राणे

24 Sep 2022 13:55:30
 



मुंबई : पीएफआयवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पुण्यातील या मोर्चावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. यावरून  भाजप युवा आमदार नितेश राणेंनी घोषणाबाजी करणाऱ्यांना 'चुन चुन के मारेंगे...इतना याद रखना !', असे म्हणत संताप व्यक्त केला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेल्या कट्टरपंथीय तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत.

या देशद्रोह्यांवर कारवाईची मागणी करत आमदार नितेश राणे म्हणाले, पीएफआयच्या समर्थनात काही नालायकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या नारे दिले आहे. हे लोक कदाचित विसरले असतील या महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. देशाच्या विरुद्ध कोणीही अशापद्धतीने नारे देत असतील तर अशा देशद्रोह्यांना शिक्षा झालीच पाहिजे.  हे पोलीस खात्याने लक्षात ठेवावे. या लोकांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी अशी मागणी मी पोलीस खात्याकडे करतो. अशी हिम्मत पुन्हा होता काम नये. याचीही पोलीस खात्याने दक्षता घ्यावी. 




Powered By Sangraha 9.0