उद्या ‘पितृपक्ष’ संपणार…

भाजपचा ट्विटमधून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

    24-Sep-2022
Total Views |

keshav upadhye



मुंबई दि २४ सप्टेंबर : काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यातून भाजप आणि मनसेवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसेनेही उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. ते कर्तव्यशून्य आहेत, अशी थेट टीका केली होती. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंकडे  इशारा करणारे सूचक ट्विट केले आहे.
भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले की, उद्या ‘पितृपक्ष’ संपणार असे म्हणत पुढे उपाध्ये म्हणतात बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजीपार्कवर हसरा मेळावा, असा टोमणाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. दरम्यान, पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते, माझा पक्ष हा पितृ पक्ष आहे कारण तो माझ्या वडिलांनी स्थापन केला आहे. अशात उद्या (रविवार) सर्वपित्री अमावस्या असल्याने हाच धागा धरत केशव उपाध्येंनी उद्या पितृ पक्ष संपणार असे ट्विट केले आहे.
शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यापूर्वी, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. मात्र मुंबई महानगरपालिकेने या दोघांनाही परवानगी नाकारली होती. मात्र त्यांनतर उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्याने उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याने याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.