रॉजर फेडररची टेनिसमधून निवृत्ती!

प्रतिस्पर्धीही झाले भावुक!

    24-Sep-2022
Total Views |

roger federer
 
 
लंडन: रॉजर फेडरर याने अखेर टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. २३ सप्टेंबर रोजी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपली. या शेवटच्या सामन्यानंतर रॉजर फेडररला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो ढसाढसा रडताना दिसला. या भावनिक क्षणात राफेल नदालही त्याच्यासोबत अश्रू ढाळताना दिसला.
 
 
रॉजर फेडरर हा तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. गेल्या आठवड्यात त्याने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे तो बराच वेळ टेनिस कोर्टच्या बाहेर फिरत होता. अशा स्थितीत त्याने लेव्हर कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची घोषणा केली होती.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.