फडणवीसांकडे नागपूर तर लोढांकडे मुंबई उपनगर ! वाचा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

    24-Sep-2022
Total Views |
 




मुंबई दि. २४ सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार पालकमंत्र्यांची यादी जाहीर कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 
विशेष म्हणजे या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, अमरावरी आणि गडचिरोली या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भाजप नेते गिरीश महाजन यांना धुळे,लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराचे पालकमंत्री पद दीपक केसरकर यांना तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री पद मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आले आहे. 

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे 

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 
सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर,गोंदिया, 

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक, 

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली, 

दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.