रत्नागिरी किनारपट्टीजवळ डांबर नेणारे जहाज बुडाले; प्रदूषणाची भीती

23 Sep 2022 14:17:51
ओईल स्पील
 
 
मुंबई: रत्नागिरीच्या किनार्‍याजवळ शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी डांबर वाहून नेणारे जहाज अपघात ग्रस्त झाले. हे जहाज बुडाण्यापूर्वी भारतीय तटरक्षक दलाने १९ खालाश्यांची सुटका केली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषणाची भीती निर्माण झाली होती. रत्नागिरी किनाऱ्यापासून ४१ नाॅटीकल मैल लांब ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मालवण आणि गोवा किनारपट्टी लगत गळती झाली. मालवण किनारपट्टी जवळ पाण्यात डांबराचे गोळे आढळून आले.
 
 
जहाज दुर्घटनेमुळे झालेल्या गळतीने सागरी जीव संपदेला धोका पोहोचला असण्याची शक्यता सागरी जीव अभ्यासकांनी नोंदवली आहे. सुटका करण्यात आलेल्या खालाश्यांपैकी १८ भारतीय आणि १ इथिओपियन नागरिकाचा समावेश आहे. (रत्नागिरी)  तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दुबईस्थित गॅबॉन-ध्वज असलेल्या जहाजाच्या मालकांना प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. गळती रोखण्यासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क करण्यात आले. ओमानच्या आखातावरील खोर फक्कन या प्रमुख यूएई बंदरातून न्यू मंगळुरू बंदरापर्यंत३,९११ मेट्रिक टन डांबरी बिटुमन घेऊन जाणार्‍या एमटी पार्थला शुक्रवारी सकाळी 9.23 वाजता 41 नॉटिकल मैल (76 किमी) पश्चिमेला असताना हा अपघात झाला.
 
 
पाण्याच्या बॅलास्ट टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने हे जहाज अपघता ग्रस्त झाले. क्षणाचा ही विलंब न अकर्ता भारतीय तटरक्षक दलाला कळविण्यात आले. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर या भागात आले आणि कर्मचाऱ्यांना लाईफबोटीतून वाचवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. जहाजावरील सर्व १९ जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्याच्या जवळपास आठ तासांनंतर, रात्री ९ च्या सुमारास हे जहाज पाण्यात संपूर्ण बुडाले. यामुळे डांबराचे गोळे सर्वत्र समुद्रात पसरले आणि झालेल्या प्रदूषणामुळे सागरी जीव संपदेला धोका निर्माण झाला. मालवण किनारपट्टीवर दामाबाराचे गोळे आणि तेल देखील वाहून आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0