गटारातून बाहेर काढले आठ फुटाचे अजगर!

    22-Sep-2022
Total Views |

bhandup
 
मुंबई: ईशान्य मुंबई स्थित भांडूप शहरातील हनुमान नगर परिसरातील शंकर ड्रायवर चाळीतून एका आठ फुटाच्या अजगराला वाचवण्यात आले आहे. चाळीलगत असलेल्या गटारात या अजगराला पाहिल्यावर सुजन नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी वन विभागाला कालवून सर्पमित्रांना घटना स्थळी पाठवले. या अजगराला बाहेर काढताना सर्प मित्रांची दमछाक झाली.
 
 
 
मात्र, संयम दाखवून या सर्पमित्रांनी या अजगराला गटारातून बाहेर काढले. वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. स्थानिक रहिवाशी गौरव सावंत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका अजगराचा जीव वाचला आहे. वन्यजीव अधिनियम १९७२नुसार भारतीय अजगर संरक्षित प्रजाती आहे.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.