'पीएफआय'चे मनसुबे: साल 2047 पर्यंत भारताला दारूल-इस्लाम बनवणे!

    22-Sep-2022
Total Views |

pfi
 
 
नुकतंच 'पीएफआय' या इस्लामिक संघटनेच्या वतीने प्रकाशित झालेले 'इंडिया २०४७' हे पुस्तक उघडकीस आले. त्यामध्ये 'पीएफआय' स्पष्टपणे सांगते की ७५ वर्षांपूर्वी एक इस्लामिक देश भारतापासून वेगळा झाला आणि २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल तोपर्यंत भारताचे इस्लामिक राष्ट्र होईल.
 
 
या पुस्तकात असे म्हटले आहे की -
 
“जर आपण इस्लामचा इतिहास पाहिला तर, मुस्लिम नेहमीच अल्पसंख्य होते आणि विजयासाठी आपल्याला बहुसंख्य असण्याची गरज नाही. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ला खात्री आहे की एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी १०% मुस्लिम जरी आपल्यासोबत आले, तरी 'पीएफआय' भ्याड बहुसंख्य समुदायाला गुडघे टेकण्यास भाग पाडू शकते आणि भारतात इस्लामचे राज्य परत आणू शकते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व 'पीएफआय' नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे अशी योजना तयार करण्यात आली आहे आणि त्यानुसार मुस्लिम समुदायाला, विशेषतः 'पीएफआय' कार्यकर्त्यांना या ध्येयाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. 'पीएफआय' कार्यकर्त्यांना आणि मुस्लिम तरुणांना वारंवार सांगितले पाहिजे की ते सर्व 'दीन'साठी काम करत आहेत. अल्लाहने जग/कायनात निर्माण केले होते आणि मुस्लिम दोन कारणांसाठी बनवले गेले होते, पहिले अल्लाहचा कायदा स्थापित करणारे आणि दुसरे म्हणजे मुस्लिम पृथ्वीवरील दाई आहेत. हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला इस्लामची राजवट प्रस्थापित करावी लागेल.”
 
 
'पीएफआय'ने आपले ध्येय यशस्वी करण्यासाठी चार टप्प्यांची योजना तयार केली आहे. ते म्हणतात की -
 
"पहिल्या टप्प्यात, जिथे जिथे मुस्लीम असतील तिथे आपण स्वतःला स्थापित केले पाहिजे आणि त्यांच्या पंथ व विचारधारेची पर्वा न करता त्यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या झेंड्याखाली एकत्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मुस्लिम समाजाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची वारंवार आठवण करून देण्याची आणि जिथे काही नाही तिथे अत्याचाराच्या कथा निर्मांण करण्याची गरज आहे. आपल्या सर्व आघाडीच्या संघटनांनी विस्तार व नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासोबतच भारतीय असण्याच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रत्येकामध्ये इस्लामिक ओळख निर्माण करावी लागेल. आम्ही आमच्या 'पीई' विभागात सदस्यांची भरती व प्रशिक्षण सुरू करू ज्यामध्ये त्यांना हल्ला करण्याचे व बचावाचे तंत्र, तलवारी, रॉड आणि इतर शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल."
 
 
"दुस-या टप्प्यात, आम्हाला अत्याचाराच्या कहाण्यांचा सर्वदूर प्रचार करून 'पीएफआय'च्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात एकत्रीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील. आपली ताकद दाखवण्यासाठी आणि आपल्या विरोधकांना घाबरवण्यासाठी निवडक हिंसाचाराचा वापर करावा लागेल. तसेच, आपल्या प्रशिक्षित कार्यकर्ते सुरक्षा यंत्रणांपासून दूर ठेवावे लागेल. ज्या कार्यकर्त्यांना 'पीई' प्रशिक्षण दिले गेले आहे, त्यांच्यामधून प्रतिभावंतांना शोधावे लागेल आणि त्यांना बंदूक व स्फोटकांसह शस्त्रास्त्रांचे प्रगत प्रशिक्षण द्यावे लागेल. दरम्यान, आपल्या संघटनेकडून 'राष्ट्रध्वज', 'संविधान' व 'आंबेडकर' यांसारख्या प्रतीकांचा वापर इस्लामिक शासन स्थापन करण्याचा आपला खरा हेतू लपवण्यासाठी आणि एससी/एसटी/ओबीसींपर्यंत पोहोचण्यासाठी केला पाहिजे. आपण कार्यपालिका व न्यायपालिकेपर्यंत पोहचले पाहिजे आणि महत्त्वाची माहिती गोळा करून आपल्या हिताच्या बाबींमध्ये आपल्यासाठीअनुकूल निकाल यावा याकरिता आमच्या सदस्यांना या सर्व स्तरांवर घुसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे, निधी आणि इतर मदतीसाठी परकीय इस्लामिक देशांशी संपर्क स्थापित केला पाहिजे."
 
 
"तिसर्‍या टप्प्यात, संघटनेने एससी/एसटी/ओबीसी यांच्याशी घनिष्ठ युती केली पाहिजे आणि किमान काही जागांवर सर्व स्तरांवर निवडणुका जिंकल्या पाहिजेत. या टप्प्यात पक्षाने ५०% मुस्लिम आणि १०% एससी/एसटी/ओबीसी लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. राजकीय विजयांचा उपयोग संघटनेचा आणखी विस्तार करण्यासाठी केला पाहिजे. आरएसएस ही केवळ उच्चवर्णीय हिंदूंच्या कल्याणात स्वारस्य असलेली संघटना असल्याचे भासवून आपण आरएसएस आणि एससी/एसटी/ओबीसी यांच्यात फूट निर्माण केली पाहिजे. विद्यमान तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना बदनाम केले पाहिजे आणि मुस्लिम व एससी/एसटी/ओबीसींना त्यांच्या हितासाठी स्वतःचे पक्ष असण्याची गरज दाखवून दिली पाहिजे. सर्व आघाडी संघटनांनी पूर्वीच्या टप्प्यात सुरू केलेले काम सुरू ठेवले पाहिजे. 'पीई' विभागाने आपल्या सदस्यांच्या शिस्तीने, गणवेशात मोर्चे करून आणि आवश्यक तेथे समाजाच्या रक्षणासाठी शारीरिक हस्तक्षेप व हल्ला करून आपली ताकद दाखवली पाहिजे. या टप्प्यात शस्त्रे व स्फोटकांचा साठा करणे आवश्यक आहे."
 
 
"अंतिम टप्प्यात, संघटनेने इतर सर्व मुस्लिम संघटनांना बाजूला करून संपूर्ण मुस्लिम समाजाचे निर्विवाद नेतृत्व व प्रतिनिधित्व केले पाहिजे. संघटनेने ५०% एससी/एसटी/ओबीसी लोकांचाही विश्वास संपादन केला पाहिजे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणूनही उदयास आले पाहिजे. या टप्प्यावर, संघटनेला राष्ट्रीय स्तरावर राजकीय सत्ता मिळवण्यासाठी ही मतांची टक्केवारी पुरेशी असेल. एकदा सत्तेत आल्यानंतर, कार्यपालिका व न्यायपालिका, तसेच पोलीस व लष्करातील सर्व महत्त्वाची पदे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भरली जावीत. सैन्य व पोलिसांसह सर्व सरकारी विभागांचे दरवाजे आपल्याशी निष्ठावंत असलेल्या मुस्लिम व एससी/एसटी/ओबीसी ने भरण्यासाठी उघडले जातील आणि त्यांच्या भरतीतील मागील अन्याय व असमतोल दुरुस्त केलेला जाईल. आमच्या 'पीई' विभागाच्या कृती अधिक ऊघड होतील आणि या टप्प्यावर आपल्या कॅडरची संख्या झपाट्याने वाढेल. आपल्या हिताच्या विरोधात असलेल्यांना संपवण्यात येईल. जेव्हा आपल्याकडे पुरेसे प्रशिक्षित केडर आणि शस्त्रास्त्रांचा साठा असेल, तेव्हा आपण इस्लामिक तत्त्वांवर आधारित नवीन राज्यघटना घोषित करू. या टप्प्यावर बाह्य शक्ती देखील आपल्या मदतीसाठी येतील. आपल्या विरोधकांचा पद्धतशीरपणे व्यापक प्रमाणात नायनाट केला जाईल आणि इस्लामिक वैभव परत येईल."
 
 
"विविध राज्यांमध्ये 'योग सत्रे' आणि 'निरोगी लोक निरोगी राष्ट्र' यासारख्या मोहिमेअंतर्गत प्राथमिक स्तरावर 'पीई' वर्गांचे आयोजन केले पाहिजे. 'पीएफआय' सदस्यांना शस्त्र हाताळणी आणि स्फोटके यांचे प्रशिक्षण देण्यासाठी आमचे प्रशिक्षित 'पीई' शिक्षक विविध राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. आपल्याकडे प्रशिक्षकांची कमतरता असून संभाव्य प्रशिक्षणार्थींची संख्या खूप मोठी आहे. बेसिक 'पीई' कोर्स प्रशिक्षक, सेकेंडरी पीई कोर्स प्रशिक्षक आणि पीई मास्टर्स होण्यासाठी योग्य उमेदवारांची ओळख करून त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. पुढे, प्रगत 'पीई' अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी आमच्याकडे आतापर्यंत योग्य अशा निर्जन स्थळी प्रशिक्षण केंद्रे नाहीत. ही आव्हाने दूर करण्यासाठी, शस्त्रे व स्फोटकांचा साठा करण्यासाठी, योग्य प्रशिक्षण सुविधा व आगार स्थापन करण्यासाठी आपण विविध राज्यांतील मुस्लिम बहुल भागात किंवा दुर्गम ठिकाणी भूखंड संपादन केले पाहिजेत. या केंद्रांची ठिकाणे केवळ निवडक व्यक्तींनाच माहितीत असावीत. आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यापूर्वी सर्व 'पीएफआय' कॅडर व सहानुभूतीधारकांना मूलभूत 'पीई' प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रशिक्षित 'पीई' कॅडरची स्वतःची सेना तयार करण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे."
 
 
"अंतिम संघर्षाचा टप्पा येण्यापूर्वी हिंदू/आरएसएस नेत्यांचे वैयक्तिक तपशील आणि त्यांच्या कार्यालयांच्या ठिकाणांची तपशीलवार माहिती गोळा करून ठेवणे अत्यावश्यक आहे. विविध स्तरांवरील माहिती विभागाने त्यांचा 'डेटा-बेस' अद्ययावत करून त्याचा सतत पाठपुरावा केला पाहिजे. हिंदू/आरएसएस नेत्यांच्या क्रियाकलापांचा मागोवा घेतल्याने आपल्याला त्यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया देण्यात मदत होईल. आपल्या अंतिम उद्दिष्टाच्या योजनेमध्ये माहिती विभागाचे महत्त्व लक्षात घेऊन, सर्व स्तरांवरील विभागांचे कार्य अधिक बळकट व काटेकोरपणे करणे आवश्यक आहे."
 
 
"आपल्याला प्रशिक्षित 'पीई' कॅडरवर विसंबून राहण्याव्यतिरिक्त, राज्यव्यवस्थेशी पूर्ण संघर्षाच्या परिस्थितीत, आपल्याला मैत्रीपूर्ण इस्लामिक देशांकडून मदतीची आवश्यकता असेल. गेल्या काही वर्षांत, 'पीएफआय'ने इस्लामचा ध्वजवाहक असलेल्या तुर्कीशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित केले आहेत. इतर काही इस्लामिक देशांमध्ये विश्वासार्ह मैत्री जोपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
 
 
यावरून हे स्पष्ट आहे की, भारताचे दारुल-इस्लाम करण्यासाठी इस्लामिक संघटनांच्या योजना तयार आहेत. त्यांच्या बेकायदेशीर हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. देशाच्या सर्व सीमा सुरक्षित करून घुसखोरी रोखावी लागेल. तसेच, जे अगोदरच अवैध्यपणे घुसखोरी करून देशाच्या विविध भागात स्थायिक झालेले आहेत त्यांची ओळख करून त्यांना परत पाठवण्याची योजना करणे आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा करून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ह्या उपाययोजना तात्काळ केल्या गेल्या नाही, तर भविष्यात अराजक माजेल आणि गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल.
 
 
 
-भरत आमदापुरे
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.