"जगात सर्व काही ठीक चाललेलं नाही!"

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत अभिनेत्री प्रियांका चोप्रा व्यक्त!

    21-Sep-2022
Total Views |
 
pc

 
मुंबई: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही फक्त आपल्या कलेनेच नव्हे तर विविध सामाजिक कार्यातील सहभागामुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. प्रियांका चोप्रा हिचे जगभरात समाज कार्य सुरु असते. नुकतीच प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला हजेरी लावली होती. यावेळी तिने सभेला संबोधित केले. यावेळी प्रियांकाने ‘जगात सर्वकाही ठीक चाललेलं नाही’ असं म्हणत अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य केले.
 
या सभेत प्रियांकाने मलाला युसुफझाई आणि अमांडा गोरमन या जागतिक नेत्यांसोबत भाषण केले. प्रियांका चोप्रा २०१६ मध्ये युनिसेफची ग्लोबल सदिच्छा दूत बनली. या संस्थेसोबत ती गेली अनेक वर्ष काम करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सभेतील काही फोटो आणि व्हिडीओ प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच, यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.