शरद पवारांना बदनाम केलं जात आहे : जितेंद्र आव्हाड

पत्राचाळ प्रकरण : शरद पवार जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

    21-Sep-2022
Total Views |

pawar 1
मुंबई : आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीला तयार आहोत, अशी प्रतिक्रीया पत्राचाळ प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नाव आल्यानंतर नेते जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. पवारांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे, असेही आव्हाड म्हणाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोप करुन या पत्राचाळ प्रकरणात ईडीने आरोपपत्रात शरद पवारांचा उल्लेख केला असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आपल्यावर असलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 


आव्हाड म्हणाले, "मी आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. ते म्हणजे हे सगळे आरोप हवेत बोलून होत नाहीत. पेपरवरच बोलावं लागतं. शरद पवारांनी बैठक घेतली होती. त्यावेळी गृहनिर्माण क्षेत्राशी निगडीत सर्वच उपस्थित होते. हा प्रकल्प १९८८ चा प्रकल्प आहे. तेव्हापासून हे सगळे लाभार्थी दारोदार भटकत होते. पवारांना बैठका नव्या आहेत का? ते जेव्हापासनं राज्याच्या राजकारणात आले आतापर्यंत दहा वीस हजार बैठका घेतल्या असतील. म्हणजे त्या गृहनिर्माणासाठी असतील, कोकण रेल्वे, जेएनपीटी संदर्भात कुठल्याच महाराष्ट्राचा प्रकल्प नाही ज्यात पवारांनी बैठका घेतल्या नाहीत. बैठका घेणे पवारांना काही नवीन नाही. त्यांनी यासंबंधात बैठक घेतली. बैठकीचा जे इतिवृत्त माझी मुख्य सचिवांशी बैठक झाली." या बैठकीतील ठरलेल्या निर्णयांचे वाचनही आव्हाडांनी यावेळी केले.


 
राजकारणात आपण प्रत्येकजण संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी येतो. बैठका घेऊन संवाद साधणं चुकीचं आहे का? ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे की चौकशी करावी त्यानुसार चौकशी करायला आमचं काहीही म्हणणं नाही, असेही आव्हाड म्हणाले. "चौकशीला विरोध आमचा नाही. पण पराचा कावळा निर्माण करू नका प्रत्यक्ष साक्षीदार आहे नव्वद सालानंतर आजपर्यंत काय झालं याचं? आपण हत्तीच्या मर्मस्थळावरती घाव घातल्यानंतर हत्ती कोसळतो असे सर्व समाजाचं मत आहे.", असेही ते म्हणाले.
 
सर्वश्रुत महाराष्ट्राचं मर्मस्तर शरद पवार!


सर्वश्रुत महाराष्ट्राचं मर्मस्तर शरद पवार आहेत. त्यामुळे हे असा पराचा कावळा करायचा. आणि त्याच्यातनं भलतीच दिशा दाखवायची. हे काम केलं जातं. हे मी पुरावे सादर केले आहेत. त्यात ईडीने म्हटलयं की, "केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले की, अध्यादेशासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो न्यायालयाच्या निकालांच्या आधारे घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देशित केले. आता हा सगळा पवारांना बदनाम करण्याचा विषय आहे. डाव कट रचून पवार साहेबांना बदनाम करण्याचा कार्यक्रम आखलेला असतो.", असेही ते म्हणाले. 


शरद पवार आणि संजय राऊत हे महाविकास आघाडी बनवण्यात अग्रेसर होते आणि त्यांनी भाजपला आव्हान दिलं आता संजय राऊतांना तुरुंगात टाकलेलं आहे तरी शरद पवार अजूनही विरोधी पक्षाची मोट बांधत आहेत म्हणून अशा पद्धतीनं त्यांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही बेछूट आरोप करत नाही जी भूमिका आहे पक्षाची जी भूमिका आहे पवार साहेबांची ती महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे त्याच्याशी आम्हाला काही हे नाही आमचं म्हणणं एवढंच की आरोप केलाय ना अध्यक्षही काहीतरी म्हण भाजपचे आमचं म्हणणं आहे ताबडतोब चौकशी करा.", असेही आव्हाड म्हणाले.
"अहवाल घ्या आणि समजा समजा ना नक्की हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितांवर काय कारवाई करणार हे जाहीर करा. कायद्यानुसार चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर पवार चौकशीला सामोरं जायला तयार आहेत का वेळेस मी मागणी केली होती मी या चौकशी करा आणि चला समोरासमोर होऊन जाऊद्या, असे आव्हान तपास यंत्रणांना आव्हाडांनी दिले आहे.
उद्धव ठाकरेंनंतर पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न


या आधी उद्धव ठाकरेंना टार्गेट करून शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न केला. आता शरद पवारांना लक्ष्य केलं जातंय, अशा माध्यमातून शरद पवारची काय भूमिका असणार आहे? कारण एकत्रित राहण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु वारंवार आपल्याला मला वाटतं की ह्या राजकारणात न जाता आत्ता तुम्ही जो संबंधित प्रश्न विचारला त्याच्यावरती आम्ही आमचं स्पष्ट मत मांडलेलं आहे. याचा इतरांशी कुठल्याही संबंध जोडू नका. ही जी स्वच्छ कागदपत्र आमच्या हातात आहेत, असेही आव्हाड म्हणाले.


21 September, 2022 | 19:33


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.