पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन

21 Sep 2022 18:57:58
 
ratan
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाल, बुधवारी पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत, 4,345 मुलांना आधार देणार्‍या बालकांसाठी पीएम केअर्स या योजनेसह पीएम केअर निधीच्या मदतीने हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांवर सादरीकरण करण्यात आले. देशासाठी महत्त्वपूर्ण काळात फंडाने बजावलेल्या भूमिकेचे विश्वस्तांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान केअर फंडात मनापासून योगदान दिल्याबद्दल देशातील जनतेचे कौतुक केले.
आपत्कालीन आणि संकटकालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करताना, केवळ मदत सामग्री पुरवठ्याद्वारेच नाही तर, अशी संकटे कमी करण्यासाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढवणे या पीएम केअर्सच्या मुख्य उद्दिष्टाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. पीएम केअर फंडाचा अविभाज्य भाग बनल्याबद्दल पंतप्रधानांनी विश्वस्तांचे अभिनंदन केले.
नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडाच्या कार्यपद्धतीला व्यापक दृष्टीकोन मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नव्या सदस्यांचा सार्वजनिक जीवनाचा अफाट अनुभव, पीएम केअर फंडाला विविध सार्वजनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तत्काल प्रतिसाद देणारी संस्था बनवण्यास हातभार लावेल, असेही ते म्हणाले.

फंडाचे नवनियुक्त विश्वस्त
· न्यायमूर्ती के. टी. थॉमस, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
· करिया मुंडा, माजी उपसभापती
· रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष
फंडाच्या सल्लागार मंडळासाठी नामनिर्देशित सदस्य
 
· राजीव महर्षी, भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
· सुधा मूर्ती, माजी अध्यक्ष, इन्फोसिस फाउंडेशन
·आनंद शाह, टेक फॉर इंडियाचे सह-संस्थापक आणि इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी
 
 
Powered By Sangraha 9.0