भारतातील बहुप्रतीक्षित मारुती 'वितारा' लवकरच रस्त्यावर धावणार

21 Sep 2022 14:51:36
 
vitara
 
 
 
 
मुंबई : भारतातील महत्वाची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीची ग्रँड न्यू वितारा कार सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस रस्त्यांवर धावणार आहे. मारुती कंपनीकडून याबाबत जाहीर करण्यात आले आहे. लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आतापर्यंत तब्बल ५३ हजार लोकांनी या गाडीसाठी आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन असलेली ही कार ९.५ लाख किंमतीची असण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या दिवाळीला कारप्रेमी भारतीयांसाठी एक अनोखी भेट मारुती कंपनीकडून देण्यात येणार आहे.
 
 
अनेक अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण गोष्टींनी ही कार नटली आहे. या कारमध्ये १ इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन, ३ पेट्रोल सिलिंडर इंजिन आहेत. त्याबरोबरीने याच्या हेड लाईट्स मध्ये एलईडी बल्ब, रिअर स्पॉइलेर, एक स्टील व्हील त्याच्या कव्हर सहित, ऑटो एअरकंडिशनिंग, 'की'लेस एंट्री अँड एक्झिट अशा प्रकारच्या अनेक नावीन्यपूर्ण सुविधा आहेत.
 
 
याच विताराच्या बरोबरीने टोयोटा अर्बन क्रूझर हीही एक नवीन कार लाँच केली जाणार आहे. या वितारामुळे भारतात सध्या कार उत्पादन क्षेत्रात असलेली ह्युंदाई आणि किआ या कंपन्यांच्या मक्तेदारीला धक्का बसणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0