कोकणाची राणी; कोकण दिपकाडी

    21-Sep-2022
Total Views |
 
 
कोकणाची राणी : कोंकण म्हंटले, की डोळ्यासमोर येते ती नारळ पोफळीची बाग आणि समुद्र किनारा. परंतु, कोकणातील या जैवविविधतेने नटलेल्या वैभवशाली सड्यांबद्दल खूप कमी बोलले जाते. याच सड्यांवर अनेक वनस्पती बहरतात, त्यातीलच एक म्हणजे 'दिपकाडी'
 
 
या वनस्पतीला दिपकाडी, एकदांडी आणि गुलछडी अशी विविध नावे आहेत. आपल्या पांढऱ्या शुभ्र बहराने सड्यांचा कायापालट करणारी दिपकाडी. सद्यस्थितीला देवाचे गोठणे, राजापूर, जैतापूर, रत्नागिरी चंपक मैदान, कोळंबे पासून अगदी गोव्यापर्यंत दिपकाडी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदली गेली आहे आणि नवनवीन ठिकाणे ही दिवसेंदिवस समोर येत आहेत. यातीलच एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे साडवली.
 
 
देवरुख संगमेश्वर रस्त्यावर वसलेले गाव आणि त्या गावात असणारा सडा हे दिपकाडीचे तिच्या तीन ते चार किमी पर्यंत पसरलेल्या बहारामुळे महत्वचे आढळस्थान बनले आहे. तसा हा सडा फार मोठा ही नाही आणि मातीचे प्रमाण ही कातळा पेक्षा जास्त, त्यामुळे शेती इमारती बांधकाम सुद्धा जास्त. अनेक शैक्षणिक संस्था सुद्धा इथेच आहेत तसेच चिऱ्याच्या दगडाच्या जुन्या खाणी, रस्ता यामुळे देखील हा सडा विखंडीत झाला आहे. इतक्या सर्व बाधांवर मात करून पावसाळ्याच्या चार महिन्यात इथे फुलणारा रानफुलांचा फुलोरा ही खरंतर निसर्गाची आगळीवेगळी देणगी समजायला हवी.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.