यावेळीही भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरूनच येणार

20 Sep 2022 21:20:43
 
गजानन काळेंनी ठाकरे गटाला डिवचले

मुंबई : 
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या दसरा मेळाव्याबाबतच्या वादावर मनसेने पुन्हा एकदा उडी घेतली आहे. नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 


"शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देऊन टाकावी" असे म्हणत काळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी परवानगी देऊन टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये" असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवार, दि. २० सप्टेंबर रोजी ट्विटरद्वारे त्यांनी ठाकरे गटाला लक्ष केले आहे.


"यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे"

'शिल्लक सेनेच्या यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठीची स्क्रिप्ट देखील बारामतीवरूनच येणार आहे. हिंदुत्व विसरलेल्या या शिल्लक सेनेच्या मेळाव्याच्या स्टेजवर अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ? " असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.



Powered By Sangraha 9.0