आता बोला! पब्जीमुळे हिंसाचार वाढला! तालीबान आणणार 'ऑनलाईन गेम'वर बंदी

20 Sep 2022 18:03:14
 
 
pubg
 
 
 
तालिबानकडून लोकप्रिय मोबाईल गेम PUBG वर (बॅटल रॉयल गेम प्लेयरअननोन्स बॅटलग्राउंड्स) बंदी घालण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत अफगाणिस्तान सरकार पूर्णपणे हा गेम हद्दपार करण्याच्या तयारीत आहे. तसेच पब्जी हिंसाचार वाढविण्यासाठी कारणीभूत असल्याचेही तालीबान्यांचे म्हणणे आहे. देशाच्या टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने या आठवड्यात शरिया लॉ इनफोर्समेन्ट एडमिनिस्ट्रेशन आणि सुरक्षा क्षेत्रातील प्रतिनिधींशी एक बैठक घेतली. यात पुढील ९० दिवसांत पब्जी आणि टीकटॉकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
 
अफगाणिस्तान वृत्तसंस्थेनुसार, PUBG मोबाइल गेम पुढील तीन महिन्यांत कायमचा हद्दपार केला जाणार आहे. तर टीकटॉकवर महिन्याभरात बंदी आणली जाईल. अफगाण सरकारतर्फे देशातील टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सेवादात्यांना या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आता सोशल मीडियावर तालीबानवर मिम्स शेअर केले जात आहेत. तालिबानने हिंसेच्या जोरावर अफगानिस्तानवर ताबा मिळवला होता. मात्र, त्याऐवजी आता तालीबानच पब्जीवर बंदी आणू इच्छित आहे.
 
  
तालीबानतर्फे कोट्यवधी वेबसाईट्स बॅन
 
 
लोकप्रिय अॅप्सवर बंदी आणण्याची घोषणा केल्यानंतर तब्बल २.३ कोटी वेबसाईट्स अफगाणिस्तानने बंदी आणली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ज्या वेबसाइट्सवर अनैतिक मजकूर दाखविला जातो. त्याच्यावर कायमची बंदी आणली जाणार आहे. तालिबान सरकारचे दूरसंचार मंत्री नजीबुल्ला हक्कानी यांनी लाखों वेबसाईट्सवर आणण्याची घोषणा केली होती. मात्र, एका वेबसाईटवर बंदी आणली तर दुसऱ्या नावाने ते वेबपेज सुरू केले जात होते.
 
 
अफगानिस्तानपूर्वी भारतातही टीकटॉक आणि पब्जीवर बंदी आणण्यात आली होती. या गेममुळे असलेल्या चीनी सर्व्हरद्वारे डेटा चीनमध्ये पाठविला जात होता. त्यानंतर भारतीय युझर्सना समोर ठेवून बीजीएमआय हा पब्जीचा नवीन गेम्स लाँच करण्यात आला होता. मात्र, त्यावरही डेटाचोरीचा आरोप झाला आणि सरकारने त्यावर बंदी आणली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0