Air India पाठोपाठ तिच्या उपकंपन्यांचेही खासगीकरण

20 Sep 2022 17:30:34

air
 
 
मुंबई : सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकारणानंतर आता तिच्या दोन उपकंपन्यांचेही खासगीकरण केले जाणार आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अशी या दोन उपकंपन्यांची नावे आहेत. यांच्या खासगीकारणानंतर एअर इंडियाच्या खासगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. भारत सरकारकडून ही खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाने एअर इंडिया कंपनी १८ हजार कोटींना विकत घेतली होती.
 
 
 
 
 
भारत सरकारच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेचा हा भाग आहे. अत्यंत ढिसाळ व्यवस्थापन, बोजड कर्मचारी संख्या, सातत्याने वाढता तोटा यांमुळे सरकारी मालकीची हवी वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा ग्रुपकडे सुरु झालेली ही हस्तांतरणाची प्रक्रिया जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाली. १८ हजार कोटींना टाटा कंपनीने एअर इंडिया विकत घेतली होती. तरी एअर इंडियाच्या उपकंपन्या मात्र या हस्तांतरण प्रक्रियेचा हिस्सा नव्हत्या.
 
  
एअर इंडियावर तब्बल ६१, ५६२ कोटींचे कर्ज होते. त्यातील १५,३०० कोटी टाटा ग्रुपच्या हस्तांतरणातून मिळाले होते. उरलेले ४६ हजार कोटी त्याच्या उपकंपन्यांकडे वर्ग केले होते. आता प्रस्तावित होणाऱ्या हस्तांतरणातून सरकारने ६५ हजार कोटी मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.आता पर्यंत सीपीएससीच्या माध्यमातून २५ हजर कोटींची उभारणी झाली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0