१९५० ते २०२२, असा बदलत गेला नौसेनेचा ध्वज!

02 Sep 2022 13:58:36

Maha MTB

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शुक्रवारी नौसेनेच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. त्यापूर्वी त्यात रेड क्रॉस होता. तो हटवण्यात आला आहे. आता तिरंगा आणि अशोकच्रक, असे या ध्वजाचे स्वरुप आहे. शं नो वरुण: म्हणजे वरुण आपल्यासाठी शुभ असेल, असे ब्रीदवाक्य लिहीण्यात आले आहे. नौसेनेचा नवा ध्वज छत्रपति वीर शिवाजी महाराजांना समर्पित केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

आतापर्यंत नौसेनेच्या ध्वजावर गुलामीचं प्रतीक होतं ते आम्ही हटवलं आहे, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तीने शत्रू कापत होता, असेही ते म्हणाले. पूर्वी नौसेनेच्या ध्वजावर असणाऱ्या रेड क्रॉसची निशाणी ही सेंट जॉर्ज क्रॉसची होती. जी इंग्रजांचा ध्वज यूनियन जॅकवरुन घेतली होती. सेंट जॉर्ज क्रॉस ईसाई संतांची निशाणी होती. २००१मध्ये लाल क्रॉस हटविण्यात आला. त्यानंतर २००४मध्ये पुन्हा लावण्यात आला. त्यानंतर २००१ से २००४ पर्यंत त्यावर अशोक चिन्ह लावण्यात आले. २०१४मध्ये त्याखाली सत्यमेव जयते लिहीण्यात आले होते.





Powered By Sangraha 9.0