नवी दिल्ली: काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या खऱ्या कहाण्या जगासमोर आणण्याचे धाडस दाखवणारे 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना फिल्मफेअर फेस्टिवलला आमंत्रणच नाकारण्याचा खोडसाळपणा, आयोजकांनी केला आहे. फक्त अग्निहोत्रीच नव्हे तर त्या चित्रपटाच्या कुठल्याही कलाकाराला या सोहळ्यास आमंत्रण देण्यात आलेले नाही. आपल्याला आमंत्रण नाही याबद्दल अग्निहोत्री यांनी दुःख न व्यक्त करता आनंदच व्यक्त केला आहे. "२०१४ पासून आपल्याला आणि आपली पत्नी पल्लवी जोशी हिला या सोहळ्यास आमंत्रण येणे बंदच झाले आहे असे त्यांनी सांगितले.
काश्मिरी पंडितांच्या या नृशंस हत्याकांडाच्या खऱ्या खुऱ्या चित्रकारणाने संबंध देशवासियांना प्रभावित केले होते त्यामुळे, काश्मीर फाईल्सला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या काही नेत्यांनी हा चित्रपट म्हणजे भाजपचे लोकांची माथी भडकवण्याचे षडयंत्रच असल्याचा खोटा प्रचार सुरु केला. तरीही प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत चित्रपट सुरूच राहिला. त्यानंतर खेळ सुरु झाला तो, या चित्रपटाला कुठलाही पुरस्कार नाकारण्याचा.
६८व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्येही या चित्रपटाला डावलण्यात आले. काहीही करून या चित्रपटाचे महत्व कमीच करण्याचा डाव्या विचारांच्या लोकांचा प्रयत्न अजूनही चालूच आहे. सत्य कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस बाहेर येतंच आणि त्याला लोकांची पसंती मिळतेच हेच या चित्रपटाने दाखवून दिले आहे.