शरीरप्रकृती आणि रोगप्रवण स्थिती-भाग-10

    19-Sep-2022
Total Views |

bleeding
 
 
 
शरीरप्रकृतीबरोबर रोगप्रवणस्थितीचा अभ्यास करत असताना आपल्याला असे लक्षात येते की, ही स्थिती माणसाच्या शारीरिक व मानसिक संवेदनशीलतेवर अवलंबून असते. डॉ. हॅनेमान यांनी त्यांच्या लिखाणात ‘डायाथिसीस’ला अजून एक पर्यायी शब्द वापरला आहे व तो म्हणजे ‘प्रीडिस्पोझिशन ऑरगेनॉन ऑफ मेडिसीन.’ या ग्रंथात त्यांनी याचा उल्लेख केलेला आढळतो. त्यात डॉ. हॅनेमान स्पष्टपणे लिहितात की, रोगप्रवणस्थिती किंवा ‘डायथिसीस’ हा काही आजार नाही. परंतु ‘प्रीडिस्पोझिशन’ आहे आणि याला जर अंतर्गत व बाह्य वातावरणातील वातावरणाची साथ मिळाली, तर याचे आजारामध्ये रूपांतर होऊ शकते. It is a condition of the body which makes the tissue present in special way to certain stimuli and this needs to make the person more susceptible to certain diseases. डॉ. हॅनेमान यांच्यानंतर डॉ. बर्नेट यांनी या रोगप्रवणस्थितीचा सखोल अभ्यास केला आहे.
 
 
बाकीच्या रोगप्रवणस्थितीप्रमाणेच इथे आपण अजून एक रोगप्रवणस्थिती पाहणार आहोत व ती म्हणजे रक्तस्रावप्रवृत्त घटक. hemorrhagic diathesis'
 
रक्तस्रावप्रवृत्त घटक स्थिती ही कधीकधी जन्मत: असणारी घटक स्थिती असते किंवा कधीकधी काही आजारांनंतर व काही वेळा आजारांच्या उपचारांनंतर तयार होणारी स्थिती असते. काही आजारांनंतर व औषधाच्या दुष्परिणामांमुळे रक्तातील घटकांवर परिणाम होतो व या ‘हार्मनोलॉजिक डायथिसीस’चा जन्म होतो.
 
 
यामध्ये सततचा रक्तस्राव होणे, अचानकपणे होणे किंवा कुठेही जखम झाली असता रक्तस्राव होणे व न थांबणे, परत परत होत राहणे, अशी लक्षणे दिसून येतात.
 
अशा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावरदेखील रक्तस्राव होऊ शकतो, तसेच त्वचा व श्लेष्मा यातून ही रक्तस्राव होऊ शकतो. मोठ्या रक्तवाहिन्यांमधूनही रक्तस्राव होऊ शकतो, मोठ्या रक्तवाहिन्यांमधूनही रक्तस्राव होऊ शकतो. तसेच पचनसंस्था व गर्भाशय यामधूनही मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ शकतो. मायाझमचा विचार केला असता ‘सिफीलिटीक मायाझम’च्या जवळपास या स्थितीची लक्षणे असतात. ही स्थिती तर चिकित्सकाने वेळीच पकडली, तर पुढे होणारे गंभीर परिणाम आपण टाळू शकतो व हा अभ्यास मुख्यत्वे होमियोपॅथीमध्येच इतक्या सखोलपणे केलेला असतो. या पुढे आपण अजूनही सखोलपणे शरीरप्रकृतीचा अभ्यास करणार आहोत.
  
 
-डॉ. मंदार पाटकर 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.