व्हायरल व्हिडीओ: सिन्नरमध्ये नारळाच्या झाडावर चढले बिबटे

18 Sep 2022 17:46:08
Leopard
 
मुंबई: नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातल्या एका शेतात दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढताना आढळून आले. या घटनेचे दृश्य कॅमेरात कैद करण्यात आले आहे. सध्या याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. शेतातील नारळाच्या झाडावर बिबट्या उतरून वर चढत असल्याचा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एकामागून एक दोन बिबटे नारळाच्या झाडावर खेळताना दिसत आहेत.
 
स्थानिक गावकरी शांताराम घुमरे आणि सुनील सखाहरी घुमरे यांच्या घराजवळ गेल्या चार दिवसांपासून बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सुनील घुमरे यांच्या मका पीकाच्या शेतातून बिबट्यांचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला नारळाच्या झाडावर एक बिबट्या चढला. थोड्यावेळाने तो बिबट्या खाली उतरला. पुन्हा दुसरा बिबट्या त्याचा पाठलाग करीत आला. तेव्हा पहिला बिबट्या नारळाच्या झाडावर सरसर चढला त्याला पकडण्यासाठी दुसरा बिबट्या नारळाच्या झाडावर चढला. आपल्या शक्तिशाली पंजांनी नारळाच्या झाडावर या दोन्ही बिबट्यांचा खेळ सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0