मुंबई: येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान संस्थेने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवसात शहरातील तापमान २६ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्यातील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी वर्तवला. याशिवाय, पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे पाणी साचले. तर काही भागांत वाहतूक विस्कळीत झाली. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटांच्या उशिराने धावत होती.