"फॉक्सकॉन जायला महाविकास आघाडीची साठेमारीच कारणीभूत"

15 Sep 2022 15:37:57
 
ashish
 
 
मुंबई : "वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्यासाठी महाविकास आघाडीची साठमारीच कारणीभूत आहे" असा आरोप करत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.आज जर पेंग्विनसेना दावे करत आहे की आम्ही गुजरातपेक्षा जास्त सवलतीचा प्रस्ताव फॉक्सकॉनला दिला होता तर मग तो प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवालही आशिष शेलारांनी विचारला आहे. याला महाविकास आघाडीची साठेमारीच कारणीभूत आहे, त्यांच्या वसुली गॅंगमुळेच राज्याचे नुकसान होत आहे असा आरोपही केला आहे.
 
आम्हांला शंका आहे की सगळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार होते त्यावेळी त्यांनी अतिशय मेहनत करून हा प्रकल्प राज्यात आणला होता. त्याची सर्व प्रक्रियाही पूर्ण झाली होती पण महाविकस आघाडीच्या काळातच काहीतरी काळंबेरं झाले आहे ज्यामुळे हा महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प आत गुजरातला गेलाय त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण ही महाराष्ट्राची फसवणूक आहे, असा शब्दांत थेट निशाणाच शेलारांनी साधला आहे. राज्याचे तत्त्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच २०२० मध्ये हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही असे जाहीर का म्हणून केले होते असा सवाल शेलारांनी केला आहे.
 
महाविकास आघाडीला राज्याचा विकास करायचाच नव्हता, पेंग्विन सेनेचा यातला थयथयाट हा केवळ एकाच गोष्टीने आहे ते म्हणजे याकूब मेमनच्या थडग्यात आणि त्याच्या सौंदर्यीकरणात त्यांचे हात रंगलेत हिरवे झालेत. ते आता पुसता कसे येतील म्हणून विषयांतर करण्यासाठीचा हा मोठ्या प्रमाणात थयथयाट आहे. म्हणून याकूब मेमन ज्याने मुंबई भारतावर हल्ला केला त्याच्या थडग्याशी तुमचा असलेला संबंध परवानग्या संबंधितला उघड होतोय त्यातून ही पळवाट तुम्ही काढू शकत नाहीत. असा थेट इशाराच आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0