रस्ता असो गाव वा शेत, सगळीकडेच मस्जिद-मदरसा-मझार!

13 Sep 2022 19:58:10

mosque
 
 
उत्तरप्रदेश: भारतामध्ये कट्टरतावादाच्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या मदरशांचे लक्ष्य आता नेपाळच्या दिशेने लागले आहे. मशिदी आणि मदरशांची संख्या सातत्याने वाढत आहे. तुळशीपूरच्या दिशेने सीमेकडे जाताना मुख्य रस्त्यावरच एक मोठी मशीद आहे. विशेष म्हणजे एसएसबी कॅम्प आणि पोलीस स्टेशन ग्रामीण भागात ही मशीद बांधली आहे. या मशिदीभोवती जिल्हा न्यायालयासारख्या महत्त्वाच्या संस्थाही आहेत.
 
बलरामपूर शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर शिवा नगर परिसरात २ मशिदी आहेत. जारवा बॉर्डरवरून लौकाहवा नावाचे गाव आहे. हे गाव मुस्लिमबहुल आहे आणि येथे मशिदींव्यतिरिक्त मदरसे आहेत. पुढे प्रवेश करताच जमियत बनत अल सलाहित सिन नावाचा मदरसा आहे. त्याच्याभोवती उर्दू भाषेत आणखी काही पाट्या लिहिलेल्या आहेत.
 
येथील मदरसे हिरव्या रंगाने रंगवलेले असून सध्या कुलूपबंद आहे. तेथे कोणीही विद्यार्थी नाहीत. असे बलरामपूर ते नेपाळमधील जारवा सीमेपर्यंत सगळीकडेच मस्जिद-मदरसा-मझार चे चित्र दिसू लागले आहे. यूपी-नेपाळ सीमेवर बनावट भारतीय चलनाची तस्करी आणि अंमली पदार्थांची तस्करीही वाढली आहे. भारतासाठीही ही चिंतेची बाब आहे कारण अलीकडच्या काळात पाकिस्तानने नेपाळमध्ये सुरक्षित दहशतवादी तळ उभारण्यास सुरुवात केली आहे, असे नाही तर हिमालयातील या छोट्याशा देशात चीनही खूप रस घेत आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0