मुंबई: कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता लम्पी हा संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रात जनावरांमध्ये सध्या लम्पी आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असताना अधिक काळजी घेण्यासाठी राज्यातील पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.
यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, "मुंबई महापालिका यासर्वात पुढे असते. आमच्याकडे लंपी, झंपी उंटी कोणीही येणार नाही. आपली गुरं आपण सांभाळली पाहिजे." अशी भूमिका मांडली.