अमरावती : भाजप नेत्या नुपूर शर्मांचे समाजमाध्यमांवर समर्थन केल्यामुळे अमरावतीयेथील औषधविक्रेते उमेश कोल्हे यांची कट्टरपंथीयांकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच हत्येचा तपास करणाऱ्या एनआयए कडून या प्रकरणातील मुख्य आरोपी शहीम अहमद याला पकडून देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संपूर्ण देशभर कट्टरपंथीयांकडून गदारोळ माजवण्यात आला होता. या नुपूर शर्मा यांचे समाजमाध्यमांवर समर्थन केले म्हणून अमरावती येथील औषधविक्रेते असलेल्या उमेश कोल्हेंची कट्टरपंथीयांकडून निर्घृण हत्या करण्यात आली.
सुरुवातीला अमरावती पोलिसांकडून दाखवल्या गेलेल्या अक्षम्य दिरंगाईनंतर हा तपास एनआयए कडे सोपवण्यात आला होता. २१ जून रोजी उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आली होती. अमरावती पोलिसांनी सुरुवातीला ही हत्या लूटमार करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त केला होता. पण अमरावती जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा हा संशय व्यर्थ असल्याचे सिद्ध केले होते आणि प्रकरण लावून धरले भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही हे प्रकरण लावून धरत या प्रकरणाचा तपास एनआयए कडे सोपवावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांनतर हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आले होते.
एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहमद पैगंबरांबद्दल विधान केले होते. प्रत्यक्षात त्या काहीच खोटे बोलल्या नव्हत्या तरी कट्टरपंथीयांनी त्याविरोधात देशभर लोकांची माथी भडकावण्याचा उद्योग केला होता. नुपूर शर्मांचे समाजमाध्यमांवर समर्थन केल्यामुळे अमरावती उमेश कोल्हे राजस्थान मधील उदयपूर येथील कनैह्यालाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्या होत्या.