मुन्नावर फारूखीला वाटतंयं सगळं संपवावं!

01 Sep 2022 16:02:40
 
munavar
 
 
मुंबई : सध्या सगळीकडेच स्टॅन्डअप कॉमेडीयन्सची प्रचंड हवा आहे. देशातील तरुणाईला भावणाऱ्या, त्यांच्या विषयांवरचे विनोद खूपच लोकप्रिय होतात. पण याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन स्वतःचा अजेंडा पुढे आणण्यासाठी दुसऱ्यांच्या धर्मांची, त्यांच्या पवित्र प्रतीकांची येथेच्छ खिल्ली उडववणे कधीही वाईटच आणि त्याच्या या प्रयत्नांना लोकांनीच हाणून पाडले हा योग दुर्मिळच. पण हीच गोष्ट घडली ती मुन्नावर फारूखीच्या बाबतीत. त्याने नुकतीच सगळं संपवण्याची भाषा करतोय. एखाद्या धर्माच्या सहिष्णुततेचा गैरफायदा शेवटी लोकांच्या प्रक्षोभासच कारणीभूत ठरतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुन्नावर फारुकी
 
 
हिंदू खूप सहिष्णू आहेत, या धर्मात कोणीही उठून हे म्हणू शकतो की मी देव मानत नाही, मी देवाची पूजा अर्चा काहीच करणार नाही आणि हे सगळे असूनसुद्धा तो स्वतःला हिंदू म्हणावू शकतो, हे हिंदूंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इतका मोकळेपणा इतर धर्मांत नाही, त्या धर्मांत तर नास्तिकाला पाखंडी ठरवून त्याला मृत्यूचे शासन देण्याची परंपरा आहे. त्याच धर्माच्या मुन्नावरने आपली बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी वापरण्याऐवजी हिंदूंच्या परंपरांची खिल्ली उडवण्यासाठी वापरली. मग ते हिंदूंच्या प्रतीकांचा अपमान असो किंवा त्यांच्या अनुयायांची खिल्ली मुन्नावर ते करतच राहिला. हिंदूंनी सुरुवातीला हे सगळे सहन केले.
 
 
 
त्यांनीही ही टीका खुलेपणाने स्वीकारली पण जेव्हा या विखारी टीकेने कळस गाठला तो २०२१ मध्ये. मेरे पिया घर राम जी या गाण्याची त्याने उडवलेली खिल्ली लोकांच्या सहनशक्तीचा अंत बघणारी ठरली. हिंदू पेटून उठले मुन्नावरचे सर्वच कार्यक्रमांवर त्यांनी बहिष्कार टाकला. त्याच्यावर गुन्हेही दाखल झाले. मुन्नावरला कार्यक्रम करणे कठीण व्हायला लागले. शेवटी सहानुभूती मिळवण्यासाठी आपण हे असले विनोदी कार्यक्रम करणे बंद करत आहोत असे जाहीर केले. त्याहीवेळी त्याने लोकांच्या म्हणजेच हिंदू असहिष्णु झाले अशी बॉम्ब ठोकली होती.
 
 
आता त्याला साक्षात्कार झालाय की माझ्या एका कार्यक्रमामुळे ३० - ४० लोकांचे घर चालते असे आता तो म्हणतोय. माझे सर्व टॅलेंट फुकट जातेय, सगळं संपवून टाकावसं वाटतंय असं तो म्हणतोय पण हे उशिरा आलेले शहाणपण आहे. कोणाच्याही जीवावर बेतेल असे कुठलेच काम हिंदू कधीही करत नाहीत, हिंदूंच्या सहिष्णुतेचा, त्यांच्या समजूतदारपणाचा जो कोणी गैफायदा घेईल त्याचा मुन्नावर फारुकीच होईल असाच संदेश यातून हिंदूंनी दिला आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0