राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : जाणून घ्या कोणाकोणाला संधी

09 Aug 2022 11:25:15
 
mantrimandal
 
 
मुंबई : राज्यतील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. राज्यातील फडणवीस - शिंदे सरकरच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी होतो आहे. पहिल्या टप्प्यात १८ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, राजभवनातील दरबार हॉल मध्ये हा शपथविधी संपन्न होतो आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून प्रत्येकी ९ मंत्री शपथ घेणार आहेत.
 
शिंदे गटाकडून तानाजी सावंत, संदीपान भुमरे, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई हे मंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे- पाटील, गिरीश महाजन, सुरेख खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित हे मंत्री शपथ घेणार आहेत.
 
उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात अजून कोण संधी मिळते याची उत्सुकता आता आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0