म्हणून 'हर हर शंभू'चे मूळ गायक करणार फरमानी नाझवर कायदेशीर कारवाई!

    09-Aug-2022
Total Views |

controversy
 
 
 
मुंबई : 'हर हर शंभू' गाणं नव्या रुपात साकारण्यात आल्यानंतर वादाचा मुद्दा बनला. नेटकऱ्यांनी या गाण्याला उचलून धरले होते. सोशल मीडियावर मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता गाण्याचा कॉपीराईटचा मुद्दा गाजतोयं. अभिलीप्सा पांडा आणि फरमानी नाझ ह्या दोघींनीही या गाण्यावर आपला हक्क असल्याचे सांगितले आहे. गाण्याचे गीतकार जीतू शर्मा आता फरमानी नाझ हिच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचीही चर्चा आहे.
 
 
 
५ मे दरम्यान जीतू शर्मा यांनी आपले हे गाणे प्रदर्शित केले होते. रिलीज झाल्या झाल्या या गाण्याला थोड्याच वेळात करोडो व्ह्यूज मिळाले होते. हे गाणे जीतू शर्मा यांनी लिहिले आहे आणि अभिलीप्सा पांडा सह गायले आहे. त्यामुळे आता ते स्वतः फरमानी नाझ हिच्यावर कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले.
 
 
 
फरमानी नाझ हिने गाण्याची पूर्ननिर्मिती करुन २४ जुलै दरम्यान युट्युबवर प्रसारित केलं होतं. त्यानंतर हे मूळ गाणं तिचचं असल्याचे सांगितले होते. जितू शर्मांनी याबद्दल प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, 'फरमानीनं हे गाणे गायलं, म्हणून माझी हरकत नाही, परंतु हे मूळ गाणे तिचंच आहे, असा दावा ती सर्वत्र करत आहे. ही चुकीची बाब आहे. जर तिने माझे नाव लावून, मला आणि अभिलीप्सा दोघांनाही योग्य क्रेडिट देऊन जर तिने गाणे म्हटले असते तर, मला आनंदच झाला असता.
 
 
 
परंतु तिने कॉपीराईटचा नियम तोडला आहे. जर तिने जाहिर माफी मागितली नाही तर मी फरमानीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढेमागे बघणार नाही.' तर एका मुलाखतीमध्ये फरमानी नाझ सांगतेय, 'कोणी काय केलं मला माहित नाही. पण हे संपूर्ण गाणे आम्ही आमच्या मेहनतीने स्वतः तयार केले आहे नी लोकांना ते आवडतही आहे.' , असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.