ठिगळं कुठं कुठं लावणार? शिंदे भगदाड पाडत चाललेत!

    09-Aug-2022
Total Views |


Thackeray Shinde
 
 
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी सोमवारी (दि. ८ ऑगस्ट) आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकाटे यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. दरम्यान 'शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकवू देऊ नका! आपल्या भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला दाखवून द्या!', असे विधान उद्धव ठाकरेंनी केले. एकीकडे आदित्य ठाकरेसुद्धा ठिकठिकाणी निष्ठायात्रा घेत भडकाऊ भाषणं करत असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले.
 
खरी शिवसेना कोणाची यासाठी सध्या दोन्ही गटांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आदित्य ठाकरेंच्या निष्ठायात्रेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी पिता-पुत्रांच्या भाषणांचे स्वरूप काहीप्रमाणात भडकाऊ असल्याचे तसेच शिवसैनिकांचे रक्त खवळायला लावणारे असल्याचे दिसते. मात्र एकनाथ शिंदेंची भाषणात तसा रोख दिसत नाही.
 
एकीकडे भडकाऊ भाषणांनी पिता-पुत्र शिवसेना टिकवायला निघालेत तर दुसरीकडे शांत राहून एकनाथ शिंदे शिवसेना जोडायला निघालेत. त्यामुळे निरनिराळ्या राज्यातले शिवसेनेचे अनेक नेते शिंदेगटात सहभागी होताना दिसत आहेत. यावरून पिता-पुत्राना आपल्या भडकाऊ भाषणांचा पक्ष वाचवण्यात खरंच फायदा होणार का? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.