प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मनोरंजन सृष्टीतील आणखी एक तारा निखळला

    09-Aug-2022
Total Views |

pradeppatawardhan 
 
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपट, नाटक, मालिकासृष्टीसाठी आज आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील आणखी एक महत्त्वाचा तारा आज निखळला आहे. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 
 
तूर्तास मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, प्रदीप पटवर्धन यांचे निधन हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. प्रदीप पटवर्धन मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि नावजलेले अभिनेते होते.
 
 
 
ते गिरगावात वास्तव्यास होते. ते बरेच दिवस पडद्यापासून दूर होते. प्रदीप पटवर्धन हे मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांनाच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. खलनायक असो वा विनोदवीर आपली प्रत्येक भूमिका त्यांनी अगदी उत्तम पार पाडली आहे. ध्यानीमनी नसताना त्यांचे असे अचानक जाणे मनोरंजन सृष्टीसह सर्वच मराठी रसिकांसाठी धक्कादायक आहे.
 
 
 
प्रदीप पटवर्धन यांच्या 'मोरुची मावशी'ने त्यांना खास ओळख निर्माण करून दिली होती. त्यांचा हा प्रयोग रंगमंचावर तुफान लोकप्रिय ठरला होता. एवढेच नाही तर त्यांचे नवरा माझा नवसाचा, नवरा माझा भवरा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, भुताळलेला, गोळाबेरीज अशा कितीतरी चित्रपटांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टी देखील गाजवली होती. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील विनोदी खलनायकाची भूमिकेने तर लहानांपासून वृद्धांपर्यंत, प्रत्येकाच्या मनात घर केले होते. त्यांचे असे अचानक निघून जाणे सर्वांसाठीच दुःखद आणि धक्कादायक आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.