सेनच्या अचुक 'लक्ष्या'ने सुवर्णपदकाला गवसणी: बॅडमिंटनमधील ५वे पदक

    08-Aug-2022
Total Views |
lakshya sen
 
 
 
 
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष ऐकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदला गवसणी घातली आहे. अटीतटीच्या सामन्यात मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग याला मात देत विजय मिळवला आहे. या सामन्यात १९-२१, २१-९, २१-१६ या फरकाने सेनने तीन सेट पैकी दोन सेट जिंकत विजय मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे २०वे सुवर्ण पदक आहे. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५७ पदकं जिंकली आहेत. ज्यात १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.
 
असा रंगला अटीतटीची सामना
लक्ष्य सेन आणि यॉन्ग हे एकमेकांशी अटीतटीची टक्कर देत होते. पहिल्या सेटमध्ये यॉन्गने केवळ दोन गुणांच्या फरकाने १९-२१ ने सेट जिंकत सामन्यात १-० ची आघाडी घेतली. पण दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं जबरदस्त पुनरागमन करत एकतर्फी विजय मिळवला. २१-९ अशा फरकाने लक्ष्यनं सेट जिंकत सामन्यात १-१ ची आघाडी घेतली. ज्यानंतर अखेरचा निर्णयाक सेट कमालीचा चुरशीचा झाला. लक्ष्य आघाडीवर असतानाही यॉन्ग त्याचा पाठलाग करतच होता. पण अखेर यॉन्ग १६ गुणांवर असताना लक्ष्यनं २१ गुण पूर्ण करत सेट आणि सामना जिकंत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 
 
 
 
बॅडमिंटनमधील ५वे पदक
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेमधील बॅडमिंटनमधील भारताचे हे पाचवे पदक आहे. यापूर्वी पीव्ही सिंधूने सुवर्ण, मिश्र संघाने रौप्यपदक जिंकले. तर दुसरीकडे, भारताचा दुसरा पुरुष शटलर किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीतच कांस्यपदक जिंकले. याशिवाय त्रिशा जॉली आणि पुलेला गायत्री गोपीचंद यांनीही महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले.
 
भारताची एकूण २० सुवर्णपदके
लक्ष्य सेनचे हे सुवर्णपदक राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे २०वे सुवर्णपदक आहे. सर्वाधिक ६ सुवर्णपदके कुस्तीत मिळाले आहेत. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये ३, बॉक्सिंगमध्ये ३ आणि टेबल टेनिसमध्ये ३ सुवर्णपदके मिळाली आहेत. त्याचबरोबर ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला यावेळी अल्धोस पॉलने ऐतिहासिक असे ३ सुवर्णपदके मिळाली आहे. तसेच महिला संघाने लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याशिवाय भारताला आतापर्यंत १५ रौप्य आणि २२ कांस्यपदक मिळाले आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.