भारताचे २१वे सुवर्णपदक: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत सुवर्णपदक

सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीची सुवर्णपदकावर झडप

    08-Aug-2022
Total Views |
Satwik Sairaj Rankireddy and Chirag Shetty 
 
 
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा २१ वे सुवर्ण पदक मिळाले. बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीनं इंग्लंडला नमवून सुवर्णपदकावर झडप घातलीय. भारताच्या सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीनं इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा २१-१५, २१-१३ असा पराभव केलाय. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ५९ पदकं जिंकली आहेत. ज्यात २१ सुवर्ण, रौप्यपदक १५ आणि २३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
पीव्ही सिंधूने जिंकलं सुवर्णपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवले.
 
 
 
 
भारताची एकूण २१ सुवर्णपदके
भारताला राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये २१ सुवर्णपदके मिळाली आहेत. सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीनं बॅडमिंटन पुरुष दुहेरीत २१वे सुवर्णपदक मिळाले असून लक्ष्य सेनचे २०वे सुवर्णपदक आहे. सर्वाधिक ६ सुवर्णपदके कुस्तीत मिळाले आहेत. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये ३, बॉक्सिंगमध्ये ३ आणि टेबल टेनिसमध्ये ३ सुवर्णपदके मिळाली आहेत. त्याचबरोबर ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला यावेळी अल्धोस पॉलने ऐतिहासिक असे ३ सुवर्णपदके मिळाली आहे. तसेच महिला संघाने लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याशिवाय भारताला आतापर्यंत १५ रौप्य आणि २२ कांस्यपदक मिळाले आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.