ईडीची पीडा कायम : राऊतांचा मुक्काम ऑर्थर रोडमध्ये!

    08-Aug-2022
Total Views |

Sanjay Raut



संजय राऊतांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात ; २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समोवारो दि ८ ऑगस्ट रोजी संजय राऊतांच्या ईडी कोठडीची मुदत संपली. त्यानंतर संजय राऊत यांना  कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
दरम्यान, सोमवारी ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत औषधं देण्याची परवानगी द्यावी आणि घरातील जेवण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली असून आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य केल्या आहे. संजय राऊत यांच्या मेडिकल हिस्ट्रीचे कागदपत्रे चीफ मेडिकल ऑफिसर यांना सादर करण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी आहे
 
कोठडीत असताना रोखठोक सदर लिहिले कसे?
दरम्यान, ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा संजय राऊत यांच्या नावाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून लेख छापून आला. या लेखाची ईडी चौकशी करणार आहे. मागील ८ दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे, त्यामुळे कोठडीत असताना रविवारच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कोणी लिहिला याची चर्चा रंगली आहे. आता ईडीने सुद्धा या रोखठोक सदराची दखल घेतली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.