मोदींकडून शिकाव्यात राहुल गांधीनी या पाच गोष्टी!

    08-Aug-2022
Total Views |
 rahul gandhi
 
 
 
 
नुकतेच कॉमन वेल्थ गेम्समध्ये विनेश फोगट हिने सुवर्णपदक मिळवून देशाची मान अभिमानाने ताठ केली पण हीच विनेश फोगट काही काळापूर्वी निराश झाली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला मोटीवेट केले होते त्यावरून मोदींचे सगळ्यांकडून कौतुक होतय पण देशाला मोटीवेट करणाऱ्या या नेत्याकडून राहुल गांधीनी काय शिकायला हवे. मोदींच्या अंगी असे कोणती गुण आहेत ज्यामुळे ते एक शक्तिशाली नेता होऊ शकले.
  
 
देशासह देशातील खेळाडूंना कायम मोटीवेट करणारे आणि सकारात्मक विचार करणारे पंतप्रधान नरेद्र मोदी -

२०१४ आणि १०१८ च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये देशाला गोल्ड जिंकून देण्याची परंपरा अबाधित राखून विनेश फोगाट हिने पुन्हा एकदा २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळवून तिरंग्याची शान वाढवली. पण मागच्या टोकिओ ऑलंम्पिक्स मध्ये देशाला मेडल मिळवून न देता आल्याने विनेश खूपच खचलेली होती. क्वार्टर फायनल मध्ये हरल्याने ती पंतप्रधान नरेद्र मोदी यांना सॉरी म्हंटली होती. त्याबद्दल पंतप्रधानांनी तिची भेट घेत हार आणि जीत हे खेळाडूच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहेत, खेळाडूने हरण्याची कधीही चिंता करायची नसते. तेसेच जीत को कभी सर पें चढने मत दो| और हार को मन मे बसने मत दो| असा बहुमुल्य सल्ला देऊन विनेशला मोटीवेट केले होते. इतकेच नाही तर तिला कुटुंबासहित भेटीला बोलावले.
  
 
पुढे विनेश आपल्या कुटुंबासहित मोदींच्या भेटीला गेली. पंतप्रधानांनी देखील तिच्यासाठी आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढला. एखाद्या खेळाडूसाठी पंतप्रधानांची भेट होण हीच मुळात दुर्मिळ गोष्ट असते. पण विनेश निराश असताना पंतप्रधान मोदींनी तब्बल तीनदा तिच्याशी संवाद साधला. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या वृत्तीने जिंकलेल्या खेळाडूला सगळेच शुभेच्छा देतात पण विनेश पराभूत झालेली असताना मोदी तिच्या पाठीशी उभे राहिले.
  
 
भारतीय कुस्तीपटू पूजा गेहलोत हिला कांस्यपदक मिळालं आणि आपण देशाल सुवर्णपदक मिळवून देण्यात असमर्थ ठरलो याबद्दल तिने देशाची माफी मागितली पण पुजला देशाची माफी मागायची गरज नसून तिचे कांस्यपदक मिळवले ही देखील मोठी गोष्ट असल्याचे ट्वीटकरून मोदींनी पुजाची हिम्मत वाढवली. मोदींच्या याच सकारात्मक दृष्टीकोनाचे जगभरासह पाकिस्तानातून देखील त्यांचे कौतुक होत आहे. मोदी आपल्या देशातील खेळाडूंना मोटीवेट करतात पण आमच्या देशातील नेत्यांना खेळांची नवे माहित नाहित वा खेळाडूंबद्दल काही माहित, असे म्हणत सोशल मिडीयावर पाकिस्तानी पत्रकार व नागरिकांनी मोदींचे कौतुक करत पाकिस्तानातीन नेत्यांवर निशाणा साधला.
  
 
राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या मराठमोळ्या अविनाश साबळेंनी देखील पंतप्रधांच्या मोटीवेशनने मेडल जिंकण्यासाठी उर्जा मिळाली असे गौरोद्गार काढले होते. त्यामुळे इतरांना मोटीवेट करणे आणि सतत सकारात्मक विचार करणे हा मोदींचा गुण राहुल गांधीनी स्वतःच्या व्यक्तीमत्वात रुजवायला हवा.
 
 
सगळ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध -
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सगळ्याशी हसून खेळून बोलतात. राजकीय दृष्ट्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कितीही वैर असलं तरी त्यादोघांचे व्यक्तिगत संबंध एकदम चांगले असल्याचे बोलले जाते. ममता दीदींनी मोठ्या प्रेमाने पाठवलेले खाडीचे कुर्ते मोदी आवडीने परिधान करतात. इतकच काय तर आजादीचा अमृत महोत्सव या कार्यक्रमात पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन मोदींनी फारूक अब्दुल्ला, कम्युनिस्ट नेता सीताराम येच्चुरी, समाजवादी नेता रामगोपाल यादव, पूर्व लोकसभा स्पीकर मीराकुमारी अशा सगळ्या हार्डकोअर विरोधकांशी चौकशी करून त्यांच्याशी हसून खेळून संवाद साधला. राहुल गांधीनी मोदींकडून ही महत्वाची गोष्ट शिकायला हवी.
 
 
नीती आयोगाच्या बैठकीला पंतप्रधानांनी टीम इंडिया असा  पोस्टर लावला -
 
नीती आयोगाच्या बैठकीला देशातील वेगवेगळ्या राज्यांचे निरनिराळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आले होते. पण मोदीनी या बैठकीला उल्लेख टीम इंडिया असा उल्लेख असलेला पोस्टर लावला. नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. अशोक गेहलोत, भूपेश बघेल, भगवंत मान, जगनमोहन रेड्डी यांच्याशी त्यांनी मोठ्या आनंदाने चर्चा करून आपले कोणाशीही शत्रुत्वाचे नाते नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. मोदी एखाद्याला साफ मानाने भेटतात त्यामुळे राहुल गांधी यांनी मोदींकडून ही गोष्ट शिकणे गरजेची आहे.
 
  
देशाची एकात्मता हा मोदींचा मूलमंत्र -
 
आज काश्मीरच्या लाल चौकात मोठ्या डौलात राष्ट्रध्वज तिरंगा फडकतोय. ज्यादिवशी काश्मिरमधून कलम ३७० हटवून ३ वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी देखील लाल चौकातील दुकाने उघडी होती, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लाल चौकाला काश्मीरचे हृद्य असे संबोधले जाते. काश्मीरच्या कोणत्याही घटनेचे पडसाद पहिले लाल चौकात उमटताना दिसतात. पण यावर्षी लालचौकात सगळे आलबेल असल्याने काशीरमधले वातावरण बदलत असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे कॉंग्रेस नॅशनल हेराल्डप्रकरणी काळेकपडे परिधान करून रस्त्यावर उतरली.
  
 
पुढे त्याबद्दल अमित शहांनी समाजमाध्यमांवर याबद्दल टिपणी केल्यावर कॉंग्रेस मोदींनी काळे कपडे घातलेले फोटो व्हायरल केले पण त्याबद्दल ते स्वतःचं ट्रोल झाले. कलम ३७० काश्मीरमधून हटवल्यावर राहुल गांधीनी त्याचा विरोध केला होता पण ते करत असताना आपण देशाच्या एकात्मतेला विरोध करतोय हे राहुल गांधी विसरुन गेले. त्यामुळे काळे कपडे परिधान करून राहुल आपलं पॉलिटिकल करियर बिघडवतायत आणि लोकशाहीची बलस्थान लक्षात घेऊन मोदी लोकांच्या मनात घर करतायत.
  
 
मोदी यशाने हुरळून जात नाहीत आणि पराजयाने खचून जात नाहीत. -
 
आज देशातील जनता मोदींच्या पाठीशी खंबीर उभी आहे. म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला इतके मोठे यश संपादन करता आले. पण एकीकडे लोकसभेला बंगाल मधून मोठे यश मिळवणाऱ्या भाजपा बंगालमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवता आला नाही. अर्थात ३ आमदार संख्या असलेल्या भाजपने बंगाल मध्ये ८७ आमदार निवडून आणले. मोदींचा एकंदरीत इतिहास पाहता ते कधीही यशाने हुराळून गेले नाहीत वा अपयशाने खचून गेले नाहीत. आणि म्हणूनच आसामपासून महारष्ट्रापर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळेच त्यांना आपला नेता मानतात. मोदींची ही गोष्ट राहून गांधीना शिकण्यासारखी आहे.
 
  
सगळ्यांना आपलासा वाटणारा नेता -
  
गरीब कामगारांचे पाय धुणे असो वा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटणे असो मोदी सगळ्यांना त्याच आणि आपुलकीने उर्जेने भेटतात. ते देशातील ज्याभागात जातात त्या भागातील भाषेतील भाषेचा वापर करण्याचा आणि कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करतात. महारष्ट्रात आल्यावर ते पुणेरी पगडी परिधान करून इथल्या लोकांशी मराठीत संवाद साधतात. पंजाब ते पंजाबी पगडी घालतात तर आसाम मध्ये गेल्यावर स्थानिक वेश परिधान करतात त्यामुळे ते सगळ्यांना आपलेसे वाटतात.
  
 
अबल वृद्धांशी बातचीत करण्यासाठी ते रेडीओच्या मन कि बात या कार्यक्रमाचा वापर करतात तर तरुणासाठी शोशल मिडीयावर अॅक्टीव्ह राहतात. मोदींनी आपली नाळ भारतीय संकृतीशी जोडून ठेवलीये त्यांच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट खासगी नसते या उलट राहुल गांधी बऱ्याचदा देशाच्या बाहेर असतात इतकच काय ते आपला वाढदिवस परदेशात साजरा करत असल्याचे बोलले जाते त्यामुळे राहुल कधीही देशातील सामान्य माणसाला आपलेसे वाटत नाहीत असे अभ्यासक सांगतात.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.