बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पी. व्ही. सिंधुचा गोल्डन 'स्मॅश'!

    08-Aug-2022
Total Views |

sindhu
 
 
मुंबई: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्ण कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
 
कॅनाडाची मिशेल ली आणि भारताची पीव्ही सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा २१-१५,२१-१३ अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.