भारत चीनला दणका देण्याच्या तयारीत 'या' फोन्सवर बंदी!

    08-Aug-2022
Total Views |
smart phone
 
 
नवी दिल्ली : भारताविरोधी कारस्थाने करण्याऱ्या चीनच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. भारत हा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार असून त्यावर चिनी कंपन्यांचा ताबा आहे. सरकारने १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या चायनीज फोनवर भारतात बंदी घालण्यात येणार आहे. लावा, मायक्रोमॅक्स सारख्या देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सरकारच्या या निर्णयामुळे शाओमी, विवो, ओपो, पोको, रेडमी, रिअलमी सारख्या कंपन्यांना मोठा झटका बसला आहे, जरी या प्रकरणी सरकार किंवा कोणत्याही चीनी कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सरकारच्या या निर्णयामागे एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये देशांतर्गत कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या मते, जून २०२२ पर्यंतच्या तिमाहीत भारताच्या विक्रीपैकी $१५० पेक्षा कमी स्मार्टफोनचा वाटा एक तृतीयांश होता आणि शिपमेंटमध्ये ८०% वाटा चिनी कंपन्यांचा आहे. भारत सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, परंतु यावर चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. या चिनी कंपन्यांपुढे देशांतर्गत कंपन्या टिकू शकत नाहीत.
 
सरकारच्या या निर्णयाचा सॅमसंग आणि अॅपलला मोठा फायदा होणार आहे. सॅमसंग आपले स्मार्टफोन सतत मिडरेंज आणि एंट्री लेव्हलमध्ये देऊ शकते, तर अॅपल देखील मिडरेंजमध्ये पुढे जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की विवो, ओपो आणि शाओमी सारख्या कंपन्या आधीच आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. या कंपन्यांवर करचुकवेगिरीचे आरोपही आहेत. अलीकडेच या कंपन्यांवर ईडीचे छापेही पडले आहेत.
 
 
३४९ चीनी अॅप्सवर बंदी
२०२० मध्ये सरकारने एकावेळी सुमारे ६० चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती आणि त्यानंतर अनेक वेळा चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आतापर्यंत ३४९ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. अलीकडेच, सरकारच्या आदेशानंतर पब्जीचा नवीन अवतार बॅटल ग्राउंड मोबाईल इंडीया गुगलच्या प्ले स्टोर आणि अॅपल च्या अॅपवरून काढून टाकण्यात आला आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाला स्टोअरमधून काढून टाकण्याबाबत कंपनीने म्हटले आहे की, अॅपवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु ते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहे. हा अॅप लवकरच परत येईल.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.