बाळासाहेबांनी लावलेला गुलमोहर आज उन्मळून पडलायं...

08 Aug 2022 17:48:37

dadar
 
 
मुंबई: दादरच्या शिवाजी पार्क येथील गुलमोहर रविवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री ११च्या सुमारास कोसळून पडला आहे. हे गुलमोहराचे झाड शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी लावले होते. हे झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.
 
 
हे झाड स्मृतीस्थळाच्या बाजूलाच असले तरी, विरुद्ध दिशेला कोसळल्याने मोठे नुकसान टळले. याची पाहणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. या झाडाची आम्ही पुनर्लावणी करू असे देखील त्या म्हणाल्या.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0