शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा लांबणीवर; आदित्य ठाकरेंची तब्येत बिघडली!

    08-Aug-2022
Total Views |

Aaditya Thackeray
 
 
मुंबई: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' यात्रेचा तिसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता. पण, आदित्य ठाकरेंची प्रकृती बिघडल्याने शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. जळगाव, मालेगाव, सिन्नरच्या काही भागात आदित्य ठाकरे दौरा करणार होते. दरम्यान, कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले होते.
 
९ ऑगस्ट रोजी दौऱ्यादरम्यान, जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. यामध्ये पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक असा दौरा करणार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकहून सिन्नर ला जाणार होते. त्यानंतर सिन्नर हुन भिवंडी शहरात मेळावा होणार होता. मात्र, प्रकृती अस्थिर असल्याने लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.