मुंबईकरांची चिंता मिटली; धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा

    08-Aug-2022
Total Views |
पाऊस
 
 
 
मुंबई: गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी दि. ७ ऑगस्ट रोजी मुंबईत पुन्हा जोर धरला. मुंबईतील धरण क्षेत्रात सुद्धा लक्षणीय पाऊस पडला, त्याचाच परिणाम म्हणजे, धरणांमधील पाणी साठ्याची पातळी ९१ टक्क्यावर गेली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा, मोडकसागर या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागीलवर्षा पेक्षा यंदाच्यावर्षी पाऊसाची सुरवात जरी उशीरा झाली असली तरीही मागीलवर्षा पेक्षा सर्व धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. दि. ६ ऑगस्टच्या आकडेवारी नुसार,
 
भातसा - ८७.६४ टक्के
आताची क्षमता: ६२८,४३१ दशलक्ष लिटर
पूर्ण क्षमता: ७१७,०३७ दशलक्ष लिटर
गेल्या वर्षी या दिवशीचा पाणीसाठा: ७५.४६
 
अप्पर वैतरणा - ८३.६३ टक्के
आताची क्षमता: १८९८९० दशलक्ष लिटर
पूर्ण क्षमता:२२७,०४७ दशलक्ष लिटर
गेल्या वर्षी या दिवशीचा पाणीसाठा: ६५.५२ टक्के
 
मध्य वैतरणा-९५.५४ टक्के
आताची क्षमता: १८४,८९९ दशलक्ष लिटर
पूर्ण क्षमता: १९३,५३० दशलक्ष लिटर
गेल्या वर्षी या दिवशीचा पाणीसाठा: ८२.२८ टक्के
 
मोडकसागर-९७.५५ टक्के
आताची क्षमता:१२५,७६१ दशलक्ष लिटर
पूर्ण क्षमता: १२८,९२५ दशलक्ष लिटर
गेल्या वर्षी या दिवशीचा पाणीसाठा: ९९.८२ टक्के
 
तानसा - ९९.३० टक्के
आताची क्षमता: १४४,०६३ दशलक्ष लिटर
पूर्ण क्षमता: १४५,०८० दशलक्ष लिटर
गेल्या वर्षी या दिवशीचा पाणीसाठा: ९९.०२ टक्के
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.