ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत डोंबिवलीचे सुयश

भाजयुमोने केले खेळाडूंचे स्वागत

    06-Aug-2022
Total Views |
 
 
 
 
bjym photo
 
 
 
 
डोंबिवली : डोंबिवलीतील होली एॅजेल्स आणि पाटकर विद्यालय मधील विद्याथ्र्यानी 9 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे बाजी मारून पदकाची लयलूट केली आहे. या सर्व विजेत्या विद्याथ्र्याचे डोंबिवली स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन भाजयुमो डोंबिवलीच्या कार्यकत्र्यानी जोरदार स्वागत केले.
भाजयुमो चे अध्यक्ष मितेश पेणकर, ग्रामीण महिला आघाडी जयश्री पांजणकार, भाजपा जिल्हा सचिव विलास खंडीजोड, युवा मोर्चा डोंबिवली पूर्व मंडल कार्यकर्ते अथर्व कांबळे, दीपक त्रिपाठी, शरद जैन, अंकित रयानी, अमित देवस्थळी, रुपेश पवार यांनी विद्याथ्र्याचे स्वागत केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
नववी स्टुंडट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा 2022-23 उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 27 ते 29 जुलै या कालवधीत घेण्यात आली. या स्पर्धेत योगा, बुध्दीबळ, कॅरम, कुस्ती, कराटे, कबड्डी इत्यादी खेळांचा समावेश होता. या स्पर्धेत 20 विविध राज्यातील विद्याथ्र्यानी विविध खेळात सहभाग घेतला होता.यामध्ये महाराष्ट्राने पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळविला तर आसाम दुस:या स्थानी आणि आंध्रप्रदेशने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघ 201 विद्याथ्र्यासह सहभागी झाला होता. या स्पर्धेत विद्याथ्र्यानी 120 सुवर्ण, 45 रजत, 20 कांस्यपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल राहिला आहे. अविनाश ओंबासे यांनी विद्याथ्र्याना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
डोंबिवलीतील होली एॅजेल्स शाळेचे सहा विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत विजय प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तसेच चंद्रकांत पाटकर विद्यालयातील 9 विद्याथ्र्यानी कॅरम आणि बुध्दीबळ स्पर्धेत भाग घेतला होता. होली एजेंल्स शाळेच्या सहाही विद्याथ्र्यानी चुरशीने खेळून स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत. त्यामध्ये दोन सुवर्णपदके, तीन रजतपदके, आणि एक कांस्यपदकांची कमाई केली आहे. निरव अढळकर, अर्विना मरगजे (सुवर्णपदक), शर्विल गमरे , वैष्णवी पाटील, ओम दांडे (रजतपदक), प्रशवेत भोसले यांनी (कांस्यपदक) मिळवत महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकविले आहे. तर चंद्रकांत पाटकर विद्यालयाने कॅरममध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. बुध्दीबळ स्पर्धेत एक रौप्यपदक मिळवले आहे. सर्व खेळांडूचे प्रशिक्षक म्हणून राजू घुले, विवेक म्हात्रे यांनी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले.
 
----------------------------------------------------------
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.