जंतूनाशक फवारणीचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्रसादर केल्याने दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

06 Aug 2022 01:07:36
 
 
 
 
spraying disinfectant
 
 
 

 
 कल्याण :कल्याण डोंबिवली महापालिकेतील जंतूनाशक फवारणीचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र मिळविले. ते महापालिका प्रशासनास सादर केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात फसवणूक केल्याच्या आराेपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महापालिकेने जंतूनाशक फवारणीच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. त्यासाठी सिटी गार्ड या कंपनीने त्यांची निविदा ऑनलाईन भरली होती. तसेच एव्हरग्रीन या कंपनीनेही त्यांची निविदा ऑनलाईन भरली होती. सिटीगार्ड कंपनीने तपास केला की, एव्हरग्रीन कंपनीने उलाढाल प्रमाणपत्र जोडले आहे. ते कुठून मिळविले. त्याचा शोध त्यांनी घेतला. सिटी गार्डचे काम पाहणारे संतोष पवार यांनी ज्या चार्टर्ड अकाऊंट कंपनीकडून एव्हरग्रीने प्रमाणपत्र मिळविले. त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. चार्टर्ड अकाऊंटंट मेहराज शेख यांनी सांगितले की त्यांनी हे प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यांच्या बनावट सही शिक्का तयार करुन हे प्रमाणपत्र तयार केले असल्याचे दिसून आले. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडेही याबाबत चौकशी केली असता त्यांनीही हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगितले. एका चार्टर्ड अकाऊंटच्या नावाचा गैरवापर करुन त्यांच्यासह महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी चार्टर्ड अकाऊंट शेख यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एव्हरग्रीनचे महेंद्र सानप व रोहिदास दत्तू भेरले या दोघांच्या विरोधात फसवणूक केल्याच्या आराेपाखाली दाखल केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0