असलम शेख यांना पर्यावरण खात्याचा दणका!

06 Aug 2022 11:59:25

Aslam Sheikh
 
 
मुंबई : काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्या मढ येथे असलेल्या कथित स्टुडिओशी संबंधित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणला होता. या घोटाळ्या प्रकरणी असलम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाकडून शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
 
असलम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असून त्यापैकी ३०० कोटींची कागदपत्रे किरीट सोमय्यांनी एका पत्रकार परिषदेतून समोर आणली होती. असलम शेख यांनी मढयेथे असलेल्या समुद्रात एकूण पाच स्टुडिओ उभारले आहेत. याच सीआरझेड नियमांच उल्लघन झाल्याचे आढळून आले आहे.


Map
 
मिळालेल्या कागदपत्रांनुसार या जागेवर २०१९ साली काही नव्हतं. मात्र २०२१ मध्ये तिथे स्टुडिओ उभारला आहे. तसेच ही जागा समुद्रापासून लांब दाखवण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला आहे. "पर्यावरण विभागाने सहा महिन्यांसाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवानगी दिली होती. पण असलम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारला आहेत.", असा आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेदम्यान केला होता.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0