महाराष्ट्राच्या सुपुत्राची स्टीपलचेस शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी!

06 Aug 2022 18:49:32

cwg
 
मुंबई: महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:११:२० अशी वेळ नोंदवून रौप्य पदकावर आपलं नाव कोरल आहे. अविनाश याने याआधी देखील अनेक वेळा अशी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पण विशेष म्हणजे यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती.
 
अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत ८ मिनिटे ११.२० सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या खेळात केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटं इतकी वेळ घेत सुवर्णपदक जिंकल. तर कांस्यपदकही केनियाच्या खेळाडूने जिंकलं. आमोस सेरेमने याने ८.१६.८३ मिनिटांचा वेळ घेत कांस्यपदक जिंकलं.
 
अजून एक वैशिष्ट्य असे की, या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. ज्यानंतर आता अविनाशनेही रौप्य जिंकलं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0