हवाईदलप्रमुखांची ‘तेजस’ भरारी

06 Aug 2022 17:50:27
 

नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारतीय हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी त्यांच्या दोन दिवसीय बंगळुरू दौऱ्यात तीन स्वदेशी हलकी लढाऊ विमाने (एलसीए४०) उड्डाण केले. भारतीय हवाईदलाच्या आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत या विमानांना हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट केले जाणार आहे.-आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी) लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलएचसी, तेजस) 

 

 

यावेळी हवाईदलाच्या प्रमुखांना एलसीएच आणि एचटीटी-४० च्या क्षमता तसेच तेजसचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सद्य परिस्थिती आणि भविष्यातील योजना समजून घेण्यासाठी त्यांनी डिझाइनर आणि चाचणी टीमशी संवादही साधला.

 

 

त्यानंतर शनिवारी हवाईदल प्रमुखांनी एअर चीफ मार्शल एल. एम. कातेरे स्मृती व्याख्यानास संबोधित केले. यावेळी त्यांना हवाईदल, एचएएल आणि एरोस्पेस उद्योगातील तज्ज्ञ व सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते. हवाई दलाच्या प्रमुखांनी भारतीय वायुसेनेला भविष्यातील जलद लढाऊ दल बनविण्याच्या दिशेने त्याच्या क्षमता आणि शक्ती विकास योजनांवरही चर्चा केली.

Powered By Sangraha 9.0