ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींचा राजीनामा अखेर नामंजूर

    05-Aug-2022
Total Views |
 
disle
 
 
सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते सोलापूरमधील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर शिक्षणाधिकाऱ्यांकडून नामंजूर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने त्रास दिल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी डिसले गुरूजींनी राजीनामा दिला होता. परंतु ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहचल्यावर "डिसले गुरुजींवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही", असा विश्वास दिला होता. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर होण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात येत होते. शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढून मला मिळालेल्या अधिकारानुसार हा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर करण्यात येत असल्याचं सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाने डिसले गुरुजींवर कारवाईचा बडगा उचलला होता. मात्र त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. डिसले गुरुजींवर करण्यात आलेल्या आरोपांव्यतिरिक्त त्यांच्या चौकशी अहवालात देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. परंतु हे सर्व आरोप खोटे असल्याचे देखील नंतर समोर आले होते. डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यांनतर त्यांचा राजीनामा नामंजूर होण्यास्तही अनेकांकडून प्रयत्न करण्यात आले होते. अखेर त्यांचा राजीनामा शिक्षणाधिकाऱ्यांकडून नामंजूर करण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.