आजही अर्जुनाचा नेम अचूक; पहा व्हिडीओ

05 Aug 2022 17:51:56
arjun
 
 
 
अहमदनगर: महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात स्वदेशी विकसित लेझर-गाइडेड अँटी-टँक गाईडेड मिसाईल 'एटीजीएम'ची यशस्वी चाचणी पार पडली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि लष्कराने गुरुवारी दि. ४ ऑगस्ट रोजी मुख्य युद्ध रणगाडा असेलेल्या अर्जुन रणगाड्यातून यशस्वी चाचणी घेतली. आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूलच्या मदतीने मॅट केके रेंजमधून क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली.
 
 
एटीजीएम हे क्षेपणास्त्र मल्टी-प्लॅटफॉर्म लॉन्च क्षमतेसह विकसित केले गेले आहे. आणि सध्या अर्जुनच्या १२० मिमी रायफल गनमधून तांत्रिक मूल्यमापन चाचण्या सुरू आहेत. गुरवारच्या चाचण्यांमध्ये अर्जुन रणगाड्याने किमान ते कमाल मर्यादेपर्यंत लक्ष्य भेदण्याचे सातत्य यशस्वीरित्या दाखवले. क्षेपणास्त्रांनी अचूक मारा करत दोन वेगवेगळ्या श्रेणीतील लक्ष्ये यशस्वीपणे नष्ट केली. टेलीमेट्री सिस्टीमने क्षेपणास्त्रांच्या उड्डाणाची समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे.
 
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेझर-मार्गदर्शित 'एटीजीएम'च्या यशस्वी कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. संरक्षण संशोधन विभागाचे सचिव आणि 'डीआरडीओ'चे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी देखील लेझर-मार्गदर्शित 'एटीजीएम'च्या चाचणी फायरिंगशी संबंधित संघांचे अभिनंदन केले. 'एटीजीएम' मल्टी-प्लॅटफॉर्म लॉन्च क्षमतेसह विकसित केले गेले आहे. आणि सध्या अर्जुनच्या १२० मिमी रायफल गनमधून तांत्रिक मूल्यमापन चाचण्या सुरू आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0