म्हणून आशियातील राष्ट्रांना भारताचा आधार वाटतो!

    05-Aug-2022
Total Views |
MODI  
 
 
 
 
श्रीलंकेत नव्याने स्थापन झालेल्या नवनिर्वाचित सरकारचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी भारत सरकारने आपल्याला जीवदान दिले असे भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारचे व भारतीय जनतेचे आभार मानले. रशिया युक्रेन युद्धात देखील भारताने तारेवरची कसरत करून आपला पारंपारिक मित्र रशियाशी संबध चांगले ठेवताना युक्रेनला मदत केली. जगभरात भारत आणि भारतीयांवर प्रेम केले जाते. 
 
 
 
चीन आणि भारतामधील फरक -
 
१९९१ पूर्वी सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्धाच्या काळात जगाच्या नेतृत्वावरून जीवघेणी स्पर्धासुरू होती. रशियाच्या पतनानंतर द्वीगृही पोलारायझेशनचे राजकारण संपले. पण गेल्या काही वर्षापासून चीनने अमेरिकेच्या जागतिक नेतृताला आव्हान द्यायला सुरुवात केली. नुकताच अमेरिकी स्पीकर नैन्सी पेलोसी यांनी तैवान दौरा केल्याने चीनी डॅ्गनचा चांगलाच जळफळाट झालाय. चीन काय अमेरिका काय किंवा रशिया या सगळ्या राष्ट्रांच्या विस्तारवादी धोरणांमुळे जगाचे वाट्टोळं झालं. पण भारताने प्राचीन काळापासून कधीही विस्ताराचे धोरण अवलंबले नाही. त्यामुळे शेजारी राष्ट्र आणि भारत यांच्यात कायम शांतीचे संबंध राहिलेत याला अपवाद आहे तो फक्त पाकिस्तानचा पण आजपर्यंत भारताने स्वतःहून कधीही पाकिस्तानशी युद्ध केलेले नाही.
 
सांकृतिक आदानप्रदान आणि शांततेचे धोरण -
 
जगभरात सगळीकडेच भारतीय संकृतीचे कौतुक केले जाते. जर्मनीत संकृत भाषेचा मोठ्याप्रमाणावर अभ्यास केला जातो. पूर्वीपासून श्रीलंका, कंबोडिया,जावा,सुमात्रा,मलेशिया,बाली,सिंगापोर,मालदीव अशा अनेक देशात भारतीय भाषांचा व संकृतीचा प्रभाव आहे. जगभरासह आशियातील देशात भारतीय स्थापत्या शैली,वास्तुकला,शिल्पकलेची छाप सोडून भारताने प्राचीन काळापासून सांकृतिक आदानप्रदान केले पण ते करताना त्यादेशावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले नाही. शिव,वैष्णव आणि बुद्धाचे अध्यात्म ही भारताने जगाला दिलेला अध्यात्माची शिदोरी आहे.
 
 
 
आजही हरे राम हरे कृष्णाचा गजर करत भगवान श्रीकृष्ण आणि भगवतगीतेच्या विचारांचा प्रसार करणारी एस्कोन सारखी संस्था असेल किंवा अशो सारखे मुक्त विचारांची संकल्पना मांडणारे अध्यात्मगुरु या पैकी कोणीही इतर धर्मियांचे धर्मांतर केले नाही. म्हणूनच जगा आणि इतरांना शांततेने जागुद्या ही भारताची प्रकृती इतरांना आपलीशी वाटते. आजही जपान,चीन किंवा जगातील अनेक देशात बुद्धाधर्मीयांची संख्या अधिक आहे पण भारताच्या भूमीत जन्माला आलेल्या या पंथाने किंवा धर्माने कधीही कुठल्याही देश विभाजनाचे काम केलेलं नाही हे विशेष.
 
 
 
इतरांच्या मदतीला कोणत्याही अपेक्षेविना धावून जाणारा भारत -
 
शीत युद्धाच्या काळात देखील भारताने स्वतःचे अस्तित्व कोणत्याही बड्या देशाच्या दावणीला न बांधता गटा तटाच्या राजकारणाला फाटा देत, अलीप्तवादाचे धोरण स्वीकारले. अर्थात त्याचा फटका देखील आपल्या देशास सहन करावा लागला. मघाशी मी वर उल्लेख केल्या प्रमाणे युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी भारताची अवस्था कात्रीत सापडल्याप्रमाणे झाली होती पण पंतप्रधान नरेद्र मोदींच्या नेतृताखालील भारत सरकारने मोठ्या चातुर्याने साप भी ना मरे और लाठी भी ना तुटे| या म्हणी प्रमाणे शांततेच्या धोरणाचा अवलंब करून आपल्या देशाचे हित जपले.
 
 
 
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार श्रीलंकेच्या अधोगतीला चीन जबाबदार आहे पण श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत सापडला आणि चीनने आपले हातवर केले अखेर श्रीलंकेच्या मदतीला भारत धावून गेला. आणि तब्बल साडे तीन अब्ज डॉलरची मदत पुढे केली. इतकेच नाही तर मागील काही महिन्यांपासून इंधन,अन्न औषधे आणि गरजेच्या वस्तूंनी भरेलेली जहाजे श्रीलंकेला पाठवली. मागे नॉर्थ कोरिया मध्ये खाद्य पदार्थांची चणचण भासत असताना भारताने अन्नधान्यांनी भरलेली जहाजे नॉर्थ कोरियाच्या दिशेने रवाना केली. मंगोलिया किंवा व्हिएतनाम या देशांना देखील भारत अनेकदा मुक्त हाताने मदत करत असतो अगदी तेच कशाला कोव्हीडच्या काळात भारताने जगाला केलेला लशीचा पुरवठा हे अगदी ताज उदाहरण आहे.
 
 
 
विस्तारवाद किंवा सामरिक गोष्टीचा विरोध करणारा भारत -
 
हिंदुस्थान किंवा भारतीय भूमीवर अनेक परकीय आक्रमण झाली. शक,हून,कुशाण,मोगल इंग्रज अशा अनेकांनी या देशाच्या सांकृतिक व धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करून देशावर अत्याचार केले पण भारताने इतर राष्ट्रांच्या भूमीवर कधीही डोळा ठेवला नाही. म्हणूनच म्यानमार,भूतान अशा राष्ट्रांनी आपली संरक्षणाची जबाबदारी भारताच्या खांद्यावर टाकली आहे.
 
 
 
जपान,मंगोलिया,व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया,साऊथ कोरिया अशा अनेक शेजारी राष्ट्रांशी चीनच्या विस्तारवादी भूमिकेने वाद आहेत. अगदी तेच कशाला चीनने तिबेटचा घास घेतल्यानेच दलाईलामांना भारतात आसरा घ्यावा लागला. नुकताच चीनने तैवानवर मिसाईल डागल्याच्या बातम्या प्रसारित होतायत. त्यामुळे शक्तिशाली असून देखील छोट्या राष्ट्रांना सन्मानाची वागणूक देणारा भारत हा नेहमीच जवळचा वाटतो.
 
 
 
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मोदी सरकारची विदेशनीती -
  
भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी एलटीटीच्या श्रीलंकेतील गृहयुद्धाच्या काळात भारतीय सेना श्रीलंकेत घुसवली होती. परिणामी राजीवजींची हत्या झाली आणि देशाने एक मोठा नेता गमावला. पण त्यावेळी श्रीलंकेचा राजकीय प्रश्न हाताळण्यात राजीवजी कमी पडले असे मत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक मांडतात. आपला शेजारी हा भिके कंगाल असेल तर त्याचा सगळ्यात जास्त धोका हा शेजारी म्हणून आपल्याला असतो त्यामुळे आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या श्रीलंकेला मोठ्याभावा प्रमाणे भारताने सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला.
 
 
 
मागच्या काही वर्षांपासून जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी भारत पोहचलाय. सध्या श्रीलंकेच्या समोरील आव्हान मोठ आहे पण भारताच्या मदतीने हळू हळू तो देश रुळावर येईल. आज जागतिक राजकारणात भारताच्या भूमिकेला गाभिर्यांने घेतले जाते. म्हणूनच झेलेन्स्की यांनी युक्रेन रशिया युद्धात भारताने लक्ष घालावे असे ट्वीट केले होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.