पुणे: प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांना अश्लील आणि अभद्र भाषा वापरून धमकावणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी आवळल्या. मिलिंद मारुती गोरे असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेफाली वैद्य यांच्यावर फेसबुकवर अश्लील कमेंट करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, घाणेरडे मीम्स शेअर करणे, चारित्र्यहनन करणे व वैद्य यांना धमकावल्याप्रकरणी त्याला सोलापूर पोलिसांनी अटक केली.
३ ऑगस्ट रोजी योगेश गिराम व सोलापूर भाजप सोशल मीडिया सेलने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला सोलापूर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी अटक केली. दरम्यान, शेफाली वैद्य यांनी सर्वप्रथम पुण्यातील पौड रोड पोलीस स्टेशनमध्ये त्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे वैद्य यांना धमकावणाऱ्या मिलिंग गोरे याचा ताबा सध्या पुणे पोलिसांनी घेतला आहे.