भारतीय नौदलासाठी देशातील पहिले 'वरूण' पॅसेंजर ड्रोन सज्ज!

05 Aug 2022 18:15:38

dron
 
पुणे: पुण्याच्या चाकणमधील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीने भारतीय नौदलासाठी देशातील पहिले 'वरूण' पॅसेंजर ड्रोन तयार केले आहे. हे १३० किलो वजनासह उड्डाण करू शकते. याचे वैशिष्ट्य असे की, २५ किमी प्रवास केवळ २५ ते ३३ मिनिटांत पूर्ण करु शकणार आहे. हे ड्रोन सर्वप्रथम जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आले होते.
 
हे ड्रोन स्वयंचलित आहे. येत्या तीन महिन्यांत 'वरूण' चे समुद्र परीक्षण करण्यात येईल. जर ड्रोनमध्ये हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ड्रोन सुरक्षित लँडिंग करेल. यात एक पॅराशूटही जोडण्यात आलेले आहे. आपतकालीन स्थितीत किंवा बिघाड झाल्यास, पॅराशूट आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षित लँडिंग करेल. वरुणचा उपयोग एयर अँम्ब्युलन्स आणि दूरपर्यंत सामान पोहचवण्यासाठी करण्यात येऊ शकतो. असे कंपनीचे सहसंस्थापक बब्बर यांनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0